Tuesday 23 March 2021

दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांत हा घटक समाविष्ट केलेला असतो.

य्यम सेवा पूर्वपरीक्षा बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांत हा घटक समाविष्ट केलेला असतो.

Click here

https://www.loksatta.com/career-vrutantta/ 

New Arrival journal and their content







 

New arrival periodical and their content



 

New arrival periodical and their content








 

एमपीएससी मंत्र : चालू घडामोडी – नीती आयोग व्हिजन २०३५

नीती आयोग व्हिजन २०३५ click here

https://www.loksatta.com/career-vrutantta-news/mpsc-preparation-strategy-mpsc-exam-preparation-tips-in-marathi-zws-70-2426568/ 




Monday 22 March 2021

राजगुरू, शिवराम हरि

राजगुरू, शिवराम हरि : (? १९०८–२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. त्यांचा जन्म मध्यम वर्गीय कुटुंबात पुणे जिल्ह्यात खेड येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले. तेथे हनुमान व्यायाम शाळेच्या वातावरणात त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. वयाच्या १५ व्या वर्षी ते बनारसला संस्कृत अध्ययनासाठी गेले. तेथे न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षा ते उत्तीर्ण झाले. लघु सिध्दान्त कौमुदीचा त्यांनी अभ्यास केला. त्यांना संस्कृत व मराठीखेरीज इंग्रजी, कन्नड, मलयाळम्, हिंदी व उर्दू या भाषाही चांगल्या अवगत होत्या. शिवाजी आणि त्यांची गनिमी युध्दपध्दती यांबद्दल त्यांना विशेष कौतुक होते. काही काल ते काँग्रेस सेवा दलातही होते. बनारसला असतानाच त्यांची सचिन्द्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतिनेत्यांशी ओळख झाली. हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमध्ये दाखल होऊन त्यांनी उत्तर भारतात क्रांतीकार्यात भाग घेतला. रघुनाथ या टोपणनावाने ते प्रसिध्द होते. पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुरू झाल्यावर ते या क्रांतिसैन्याचे सैनिक बनले. त्यांचा बंदुकीचा नेम अचूक होता. त्यानंतर त्यांची भगतसिंग, जतीनदास, सुखदेव आदी नेत्यांशी, विशेषतः पंजाबी क्रांतिनेत्यांशी मैत्री झाली.

click here more information

https://vishwakosh.marathi.gov.in/31091/ 

सुखदेव : ( १५ मे १९०७ –२३ मार्च १९३१)

सुखदेव : ( १५ मे १९०७ –२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. मूळ नाव सुखदेव रामलाल थापर. जन्म लुधियानातील चौरा बाजार येथे. या ठिकाणाला नऊ घर असेही संबोधतात. आईचे नाव शल्ली देवी असे होते. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. यामुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली.

सुखदेवांनी ल्यालपूर (पंजाब) येथे १९२६ पासून तरुणांना एकत्र जमविण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘ हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ‘च्या वाङ्‌मयाचा तरुणांत प्रचार केला. दिल्ली येथे १९२८ मध्ये सर्व क्रांतिनेत्यांची गुप्त परिषद भरली. तीत ‘ हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ’ नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले. केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे पंजाबतर्फे होते. यात शिववमी, चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थीही होते. संघटनेच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाँबची कवचे बनविण्यासाठी सुखदेव लाहोरला गेले. नंतर तयार बाँबची चाचणी झांशी येथे घेतली. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी हिंदुस्थानचा इतिहास, रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोण त्यांनी अभ्यासले. कॉम्रेड रामचंद्र, भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने त्यांनी ‘नौजवान भारत सभा’ ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले : (१) स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे. (२) तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे. (३) जातियतेविरुद्घ लढणे व (४) अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे. या कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय भाग घेतला. १९२९ मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले.

Click here more information

https://vishwakosh.marathi.gov.in/25933/ 

शिवराम हरी राजगुरू

शिवराम हरी राजगुरू (जन्म : खेड-पुणॆ, २४ ऑगस्ट १९०८; मृत्यू : लाहोर२३ मार्च १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवा दलामध्ये असतानाच त्यांचा संबंध हा हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी या क्रांतिकारी संघटनेशी आला. चंद्रशेखर आझादभगत सिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. लाला लजपत राय यांच्यावर साँडर्स नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी लाठीहल्ला केला, त्यात जखमी होऊन ते मरण पावले. त्याचा बदला घेण्यासाठी १७ फेब्रुवारी १९२८ रोजी राजगुरू, भगतसिंग यांनी लाहोर येथे साँडर्सवर गोळ्या घालून त्यांना ठार केले.

नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यांतही राजगुरूंचा सहभाग होता, २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग व सुखदेव, राजगुरु यांना फाशी देण्यात आली.

Click here more information

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82 

सायबर सुरक्षा: मुद्दये आणि आव्हाने (योजना फेब.२०२०)






 

Content list of yojana April 2020


 

Friday 19 March 2021

भारतीय क्रांतिकारक भगतसिंग

भगतसिंगचा जन्म १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्याच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे किशन सिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतसिंगांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते. काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्याचे आजोबा अर्जुनसिंग हे स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदु सुधारणावादी चळवळीत असून आर्य समाजाचे सदस्य होते. त्याचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हर दयाल ह्यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.संदर्भ हवा ] त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखे ते लाहोरच्या खालसा हायस्कूल येथे गेले नाहीत. त्यांच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकारप्रती असलेली निष्ठा मंजूर नव्हती. बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारात नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर भगतसिंगांचा अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर भगतसिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले, व ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचारांचे समर्थक झाले.

Click here more information

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97 

भगतसिंग

 (२८ सप्टेंबर १९०७?-२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतीकारक. प. पंजाबमधील (विद्यमान पाकिस्तान) वंग (जिल्हा ल्यालपूर) या गावी एका शेतकरी-देशभक्त शीख कुटुंबात जन्म. आई विद्यावती व वडील किशनसिंग. किशनसिंग लाला लजपतराय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांना क्रांतीकारी वाङमयाचा प्रसार केल्याबद्दल १० महिन्यांची शिक्षा झाली (१९०९). प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या डी ए व्ही व पुढे नॅशनल कॉलेजमधून बी ए झाले (१९२३). विद्यार्थिदशेत जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकद्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढयात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेस मध्येही प्रवेश केला होता परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही. गदर चळवळीचे एक नेते कर्तारसिंग सरवा यांना दिलेली फाशी (१९१५), रोलट कायदा व जालियनवाला बाग येथील हत्याकांड (१९१९) यांसारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते

Click here more information

https://vishwakosh.marathi.gov.in/29957/ 

एमपीएससी मंत्र : अभियांत्रिकी सेवा इतिहास, राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था


Click here more Information 

https://www.loksatta.com/career-vrutantta-news/mpsc-exam-preparation-tips-in-marathi-zws-70-4-2418939/ 

Sunday 14 March 2021

Nenelibrary website

https://sites.google.com/view/bnasc-lib/home 

साम्राज्यवाद

साम्राज्यवाद : ही एक राजनीती (धोरण) किंवा कृती वा तंत्र असून त्यानुसार एक देश वा लोकसमूह दुसऱ्या देशावर वा भूप्रदेशावर आधिपत्य प्रस्थापित करतो. एखाद्या समर्थ देशाने किंवा समूहाने लष्करी वा आर्थिक सामर्थ्याच्या बळावर दुसऱ्या देशाच्या भूप्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेस सर्वसाधारणतः ही संज्ञा देण्यात येते. आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमांपलीकडे अन्य भूप्रदेशावर आधिपत्य वा नियंत्रण प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्यशाही, असे स्थूलमानाने म्हणता येईल. ती कोणत्याही प्रदेशाच्या-देशाच्या शासनसत्तेने मग ती सत्ता लोकशाही, हुकूमशाही, राजेशाही वा अभिजनवर्गवादी स्वरुपाची असली, तरी तिचा उद्देश साम्राज्यविस्तार व वसाहत स्थापून त्या भूप्रदेशाचे आर्थिक शोषण करण्याचा तसेच राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे हा असतो. त्यास वसाहतवाद असे म्हणतात. वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक विशेष आविष्कार होय. औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवादाचे स्वरुप सर्वंकष होऊन त्याची परिणती नवसाम्राज्यवादात झाली.

साम्रा ज्यवाद वा साम्राज्यशाही या शब्दाची व्युत्पत्ती इंग्र जी शब्दकोशांत पुढीलप्रमाणे दिली आहे. मूळ लॅटिन इम्पेरेटर (Imperator) व त्यापासून बनलेला लॅटिन इम्पेरियम यांचा इंग्र जी प्रतिशब्द म्हणजे इम्पीरिअलिझम (साम्राज्यवाद) हा होय. वरील लॅटिन शब्दांचा अनुक्रमे शब्दार्थ सेनाधिपती व अधिक्षेत्र (राज्य) असा आहे. प्राचीन रोमन प्रजासत्ताकाच्या काळात लढाईत विजयश्री खेचून आणणाऱ्या सेनापतीस इम्पेरेटर हा सन्मानदर्शक किताब देण्यात येई. पुढे तोच किताब सीझर, ऑगस्टस आदींच्या रूपांत सर्वसत्ताधीश या अर्थाचा झाला. त्यामुळे अभिजात लॅटिनोत्तर काळात या रोमानिक संज्ञेचा वापर सार्वभौम राजा, या अर्थी करण्यात येऊ लागला आणि त्याच्या आधिपत्याखालील क्षेत्रास साम्राज्य म्हटले जाऊ लागले. साम्राज्यविस्तारासाठी जे धोरण वा कृती सार्वभौम शासनसंस्था आचरणात आणी, त्यास स्थूलमानाने साम्राज्यवाद ही संज्ञा रू ढ झाली.

ऐतिहासिक पार्श्वभूमी : साम्राज्यवादाला प्राचीन इतिहास आहे. प्राचीन काळी इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकापासून इ. स. सहाव्या-सातव्या शतकांपर्यंतच्या काळात ईजिप्त, बॅबिलोनिया, ॲसिरिया, भारत, इराण, ग्रीस, रोम (इटली) आदी प्रदेशांत कमी-अधिक प्रमाणात वैभवशाली संस्कृत्या नांदत होत्या. त्यांपैकी ईजिप्शियन, ॲसिरियन व बॅबिलोनियन राजांनी साम्राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर खाल्डियन संस्कृतीच्या काळात नेबोपोलॅसर (इ. स. पू. ६१५–६०५) या राजाने असूर व निनेव्ह ही नगरे जिंकून ॲसिरियन सत्ता नष्ट केली आणि नव-बॅबिलोनियन साम्राज्य स्थापन केले. त्यानंतर गादीवर आलेल्या दुसऱ्या नेबुकॅड्नेझर (कार. इ. स. पू. ६०५–५६२) या खाल्डियन सम्राटाने सिरिया व पॅलेस्टाइनची किनारपट्टी पादाक्रांत करून मेंफिस नगर घेतले. त्याच्या खाल्डियन सम्राज्याच्या वर्चस्वाखाली त्याच्या मृत्यूसमयी सबंध बॅबिलोनिया, दक्षिण ॲसिरिया, सिरिया व पॅलेस्टाइन या प्रदेशांचा अंतर्भाव होता. प्राचीन इराणमधील ⇨सायरस द ग्रे (कार. इ. स. पू. ५५०–५२९) हा इतिहासकाळातील थोर सम्राट होय. त्याचे इराणी साम्राज्य विस्तृत प्रदेशावर होते. गीसचा काही भाग, भूमध्य समुद्रातील काही बेटे आणि काबूल व सिंधू यांच्या पलीकडेही त्याने मोहिमा केल्या होत्या. सायरसनंतर मॅसिडोनियाचा जगप्रसिद्घ सम्राट ⇨ अलेक्झांडर द ग्रेट (इ. स. पू. ३५६–३२३) याने ग्रीसपासून भारतातील पंजाबपर्यंत विस्तीर्ण मुलूख जिंकून घेतला. त्याला या अवाढव्य सम्राज्याची प्रशासनव्यवस्था मार्गी लावण्यास अवधी मिळाला नाही तथापि सर्व ज्ञात जगाचे ग्रीसच्या सांस्कृतिक आधिपत्याखाली एक राष्ट्र बनवावे, ही त्याची महत्त्वाकांक्षा होती. त्याचे साम्राज्य हा प्राचीन गीसच्या वैभवशाली इतिहासाचाच एक भाग मानला जातो.

ग्रीकांप्रमाणे रोमनांनीही साम्राज्यशाहीचे प्रयोग केले. प्रजासत्ताक रोमचे आधिपत्य इटलीवर प्रथम स्थापन झाले आणि पुढे त्याचे सम्राज्यात रूपांतर होऊन यूरोप, आफ्रिका आणि आशिया खंडांतील अनेक देशांवर वर्चस्व प्रस्थापित झाले. वासाहतिक सम्राज्याची स्थापना आणि वृद्घी प्रजासत्ताकाच्या नेतृत्वाखालीच झाली. इ. स. पू. ६० ते ४९ दरम्यान पॉम्पी, ज्यूलिअस सीझर आणि क्रॅसस यांनी पहिले त्रिकूट (ट्रायमव्हरेट) बनवून संयुक्त रीत्या राज्यकारभार केला. पुढे सीझर कौन्सल झाला (इ. स. पू. ५९), त्याने अनेक नेत्रदीपक विजय मिळवून यूरोपात साम्राज्य सुस्थिर केले. ऑगस्टसपासून एकतंत्र अशी सम्राटांची सत्ता सुरू झाली. ऑगस्टसने रोमन राज्यकारभाराला जे बादशाही स्वरूप आणले होते, त्यानुसार पुढील सु. दोनशे वर्षे रोमन सम्राज्याला सुखशांतीची व समृद्घीची गेली. पुढे रोम ही राजधानी असलेले पश्चिम रोमन साम्राज्य हे रानटी टोळ्यांच्या कचाट्यात सापडले (इ. स. ४१०) आणि अखेर ते इ. स. ४७६ मध्ये पूर्णतः नष्ट झाले मात्र कॉन्स्टँटिनोपल हे राजधानी असलेले पूर्व रोमन साम्राज्य तुर्कांनी जिंकून घेईपर्यंत (१४५१) टिकून राहिले.

click below link and get more information

https://vishwakosh.marathi.gov.in/25589/ 

मौखिक इतिहास (Oral History)

ऐतिहासिक घटनांमधील साक्षीदारांकडून त्यांच्या स्मृतींवर आधारित माहिती गोळा करणे व त्यांचे विश्लेषण करणे म्हणजे मौखिक इतिहास होय. ही क्रिया एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिकपद्धतीने जात असते. असंरचित मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीकडून एखाद्या घटनेची, कार्यक्रमाची किंवा क्रियेची माहिती गोळा करण्याची ही पद्धती होय. मौखिक इतिहास हा व्यक्तिच्या आठवणींवरती आधारित असतो. भूतकाळात घडलेल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या घटना व्यक्ती तिच्या आठवणींच्या आधारे एखाद्यास सांगतो व ऐकणारा त्या आठवणींच्या आधारावरून विश्लेषण करीत असतो.

मौखिक इतिहासपद्धती ही ऐतिहासिक दस्तऐवजीकरणासाठी वापरात येणारी सर्वात जुनी पद्धती मानली जाते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात युरोपियन समाजात प्रामुख्याने अशिक्षित–सर्वसामान्य समाजावरील संशोधनात मौखिक इतिहासपद्धतीचा वापर केला गेला. मौखिक इतिहासपद्धतीचा वापर ब्रिटनमधील कामगारांची परिस्थिती समजून घेण्यासाठी देखील केला गेला. तसेच पहिल्या व दुसऱ्या जागतिक युद्धांतील साक्षीदारांकडून युद्धाच्या आठवणी जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या पद्धतीचा वापर करण्यात आला.

Click here more information

https://marathivishwakosh.org/38066/ 

इब्राहिमखान गारदी (Ibrahim Khan Gardi)

गारदी, इब्राहिमखान : (? – १७६१). पानिपतच्या तिसऱ्या लढाईतील मराठ्यांचा एक प्रमुख सरदार. या लढाईत त्याने गारद्यांच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. तुकडीचे नेतृत्व असल्याने त्याने खान या नावाची पदवी धारण केली.

पाँडिचेरी येथे द ब्यूरी नावाचा एक कामगार होता. त्याच्या पालखीपुढे छडी घेऊन धावणारा एक लहानसा शिपाई म्हणून इब्राहिम खान काम करीत असे. त्यास थोडेफार पोर्तुगीज येत होते. लवकरच  त्याने आपल्या कार्यकर्तृत्वावर फ्रेंच फौजेत अंमलदारी मिळवली. पुढे फ्रेंचांची नोकरी सोडून तो निरनिराळ्या दरबारांत आपली कर्तबगारी दाखवू लागला. हैदराबादच्या निजामाच्या सेवेतही तो होता.

फ्रेंचांच्या पलटणीतील अधिकारी बुसी याने हिंदुस्थानात प्रथम गारद्यांची पलटण तयार केली. इब्राहिमखानानेही प्रशिक्षण घेतले होते. तो या बुसीचा चेला होता. मराठ्यांकडे मुज्जफरखान हा तोफखाना चालविणारा एक उत्तम गारदी होता. परंतु, तो जितका हुशार,कल्पक, तितकाच बेइमानी आणि खुनशी होता. त्याच्या ह्या वृत्तीमुळे सदाशिवराव भाऊ आणि त्याचे पटत नसे. इब्राहिमखान हा वऱ्हाडात निजाम अलीकडे काही दिवस होता. पेशवा आणि निजाम यांच्यात डिसेंबर १७५७ साली सिंदखेडला झालेल्या लढाईत इब्राहिमखान निजामाकडून लढला. मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. पुढे सलाबतजंगने बसालतजंगास आपला कारभारी म्हणून बदलून त्या जागी निजामअलीची नेमणूक केली. ही नेमणूक करताना निजाम अलीने इब्राहिमखानास नोकरीवरून काढावे, ही अट ठेवली. याचा फायदा घेऊन मराठ्यांनी इब्राहिमखानास नोकरीवर ठेवले. जून १७५८ नंतर हा मराठ्यांना येऊन मिळाला. उदगीरच्या लढाईत हा सदाशिवराव भाऊंच्या बरोबर होता. उदगीरनंतर सदाशिवराव भाऊंची पानिपतावर रवानगी झाली. तेव्हा इब्राहिमखान यांच्या इमानाविषयीचा उल्लेख भाऊसाहेबांच्या बखरीत सापडतो. एकनिष्ठतेची शपथ म्हणून सदाशिवराव भाऊंनी त्यास बेलभंडारा दिला, तर त्याने भाऊंना साजक रोटी (शपथेचा एक प्रकार) दिली. सदाशिवराव भाऊंच्याबरोबर दिल्लीस जाताना त्याच्या हाताखाली दहा हजार गारदी व शंभर तोफांचा तोफखाना होता.

click here more information


https://marathivishwakosh.org/36087/ 

पानिपतची तिसरी लढाई (Third Battle Of Panipat)

पार्श्वभूमी : अफगाणिस्तानच्या पातशाहाने संपूर्ण अफगाणिस्तान आपल्या आधिपत्याखाली आणल्यावर मुघल सत्तेवर स्वारी करण्याचे त्याने ठरविले आणि अफाट सैन्य घेऊन १७६० साली तो खैबर खिंडीतून पेशावरमार्गे पंजाब प्रांत पार करून दिल्लीवर चालून आला. मुघलांनी मराठ्यांची मदत मागितली आणि मराठ्यांनी मदतीसाठी आपले सैन्य सदाशिवरावभाऊंच्या आधिपत्याखाली दिल्लीला रवाना केले.

सदाशिवरावभाऊ १४ मार्च १७६० ला परतूडहून निघून पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा जंगी फौज मजलदरमजल करीत २ ऑगस्टला दिल्लीत पोहचली. आग्र्याला यमुना पार करून अहमदशहा अब्दालीशी अंतर्वेदीमध्ये (गंगा-यमुनामधील दुआबाचा प्रदेश) सामना करण्याचा भाऊंचा बेत दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमुळे तडीस जाऊ शकला नाही. मग सप्टेंबर १७६० अखेरीस मराठ्यांनी पानिपतमध्ये मोर्चाबंदी केली. १६ ऑक्टोबरला कुंजपुरा किल्ल्यावर धाड घालून अब्दालीची रसद त्यांनी लुटल्यावर तो बिथरला. २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान मराठ्यांच्या नकळत बांधपत येथे त्याच्या सैन्याने यमुना ओलांडली आणि मराठ्यांच्या दक्षिणेला त्याने मोर्चाबंदी केली. मग अब्दालीने पद्धतशीरपणे अगडबंब मराठा फौजेची रसद आटवली. यमुना पार करण्याची धूर्त चाल आणि रसद गोठवण्याचे डावपेच यांमुळे सदाशिवरावभाऊ कोंडीत सापडले आणि उपासमारीला कंटाळून १३ जानेवारी १७६१ रोजी त्यांनी ही कोंडी फोडण्यासाठी चढाई करण्याचे ठरवले. १४ जानेवारी २०१४ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस ठरला.

व्यूहरचना आणि रणनीती : दोन्ही बाजूंचे सेनाबळ बऱ्याच प्रमाणात समसमान होते. दोन्ही सेनांचे घोडदळ ४० हजारांच्या घरात होते. मराठ्यांच्या ३०–३५ हजार पायदळासमोर अफगाणी पायदळ ५०–५५ हजारांच्या घरात होते. मराठ्यांच्या २०० फ्रेंच बनावटीच्या तोफा, उंटावरील सुतरनाळा, जेजाला, जंबुरके या तोफा आणि इब्राहिमखान गार्दीसारखा अनुभवी तोपची यांमुळे त्यांचा तोफखाना संख्येत आणि आधुनिकतेत दुराण्यांपेक्षा उजवा होता. ती कमतरता भरून काढण्यासाठी अब्दालीने उंटावरील हलक्या आणि फिरत्या अशा एक हजार तोफा उभ्या केल्या होत्या. या तोफा त्यांच्या गतिमानशीलतेमुळे प्रभावी ठरल्या. अब्दालीच्या सैन्यात अफगाणिस्तानी आणि हिंदुस्तानी गिलचे समप्रमाणात होते.

पश्चिमेस पानिपत भोवतालचा खंदक आणि पूर्वेस यमुना यांच्या दरम्यान मराठा सैन्य पश्चिम-पूर्व सरळ रेषेत तैनात होते. पश्चिमेस होळकर व शिंद्यांच्या तुकड्या, मध्यभागी भाऊसाहेब आणि विश्वासराव यांची शाही हुजरात. त्यांच्यालगत विठ्ठल शिवदेव, दमाजी गायकवाड, विंचूरकर आणि अंताजी माणकेश्वर यांच्या तुकड्या आणि इब्राहिमखान गार्दी यांची तुकडी पूर्वेच्या कोपऱ्यात होती. भाऊंच्या मागे समशेर बहाद्दूर, यशवंतराव पवार, सटबोजी जाधव, नाना पुरंदरे यांचे दस्ते होते. दुर्दैवाने भाऊंनी राखीव अशी कोणतीही तुकडी पिछाडीस ठेवली नव्हती. ही एक चूक ठरली.

Click here more Information

https://marathivishwakosh.org/2828/ 

ओपेक (Opec)

पार्श्वभूमी : खनिज तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणारी ही एक बहुराष्ट्रीय संघटना आहे . तेरा सभासद देश असलेल्या  ‘ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज’ (Opec) या संस्थेची  स्थापना सप्टेंबर १९६० मध्ये बगदाद येथे झाली व जानेवारी १९६१ मध्ये इराक, इराण ,सौदी अरेबिया, कुवेत आणि व्हेनेझुएला या  पाच देशांनी या संस्थेची औपचारिक संरचना केली. त्यानंतर तीत कतार (१९६१), इंडोनेशिया व लिबिया (१९६२), संयुक्त अरब अमिराती (१९६७), अल्जीरिया (१९६९), नायजेरिया (१९७१), एक्वादोर (१९७३), गॉबाँ (१९७५), आणि अंगोला (२००७) या देशांची भर पडली. ओपेकअंतर्गत देश जगातील ४२ टक्के तेल उत्पादन करतात आणि ७३ टक्के साठ्यात भागीदार आहेत. त्यामुळे तेलाच्या जागतिक किमतींवर त्यांचे नियंत्रण असते. त्याआधी अमेरिकेचे वर्चस्व असणाऱ्या सात आंतरराष्ट्रीय कंपन्या (सेव्हन सिस्टर्स) ही किंमत ठरवित असत. ओपेकच्या उत्पादन आणि साठ्याचा दोन तृतीयांश भाग इराणच्या आखातातील सहा मध्य-पूर्व देशांपाशी आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये अल्जीरिया, एक्वादोर, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती व व्हेनेझुएला हे देश ओपेकचे सभासद होते.

press below link for more information

https://marathivishwakosh.org/14861/ 

मराठा अंमल

मराठा अंमल: छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. सतराव्या शतकात महाराष्ट्रात हिदवी स्वराज्य स्थापन करून मराठी सत्तेचापाया घातला. आठराव्या शतकात हिंदूस्थानभर मराठी सत्तेचा विस्तार झाला. हिंदूस्थानच्या इतिहासात हा कालखंड मराठी सत्तेच्या परमप्रभुत्वाचा (मराठा सुप्रीमसी) कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरविला आहे. मराठ्यांची सत्ता  इ. स. १८१८ पर्यंत टिकली. या नोंदीत मराठेशाहीचा म्हणजे मराठा अंमलाचा पुढील अंगांनी थोडक्यात परामर्श घेतला आहे: (१) ऐतिहासिक आढावा, (२) राज्य व्यवस्था (३) सैनिकी व्यवस्था (४) न्यायव्यवस्था,(५) मुलकीव्यवस्था, (६) आर्थिक स्थति, (७) सामाजिक स्थिती, (८) कला आणि खेळ आणि (९) मूल्यमापन व र्‍हासाची मीमांसा. यांशिवाय मराठा अंमल या विषयाशा निगडीत असलेल्या तसेच त्यासंबंधी विविध अंगांनी माहिती देणार्‍या काही स्वतंत्र नोंदी विश्वकोशात  अकारविल्हे यथास्थळी दिलेल्या आहेत. अशा नोंदी साधारणपणे पुढील प्रकारच्या आहेत:

(१) इतिहासग्रंथ, इतर ऐतिहासिक वाङमय व इतिहासकार: उदा., इतिहासलेखनपद्धति बखर वाङमय मराठी साहित्य (इतिहास लेखन) वि. का. राजवाडे, गो. स. सरदेसाई, ग. ह. खरे, द. वा. पोतदार, ग्रँट डफ, जदुनाथ सरकार इत्यादी. (२) मराठा अंमलाची विशेष माहिती देणार्‍या नोंदी : उदा., आज्ञापत्र इंग्रज मराठे युद्ध पेशवे मराठ्यांची युद्धपद्धती मराठा राजमंडळ इत्यादी. (३) मराठिशाहीतील महत्वाच्या व्यक्ती: उदा., छ. शिवाजी व त्यानंतरचे बहुतेक सर्व छत्रपती बाळाजी विश्वनाथ व त्यानंतरचे इतर सर्व पेशवे. महादजी शिंदे, नाना फडणीस, हरिपंत फडके इ. मराठे सरदार आणि मुत्सदी. (४) मराठेशाहीतील महत्वाची घराणी व संस्थाने: उदा., गायकवाड, पटवर्धन, पवार, भोसले, शिंदे, होळकर इ. घराणी व इंदूर, औंध, कोल्हापूर, झांशी, ग्वाल्हेर, बडोदे इ. संस्थाने. (५) मराठेशाहीतील महत्वाच्या लढ्या: उदा., खर्ड्याची लढाई पानिपतची लढाई, राक्षसभुवनची लढाई इत्यादी. (६) मराठा अंमलाच्या पूर्वोत्तर काळातील महत्वाच्या राजसत्ता : उदा., आदिलशाही, निजामशाही, बहमनी सत्ता, मोगलसत्ता, यादव वंश, विजयनगरचे साम्राज्य. (७) याशिवाय महाराष्ट्र राज्यावरील व्यातिलेखात इतिहास या उपविषयाखाली मराठा अंमलविषयी धावता आढावा देण्यात आलेला आहे.

जिज्ञासू वाचकांना वरील सर्व नोंदीतून मराठा अंमलाविषयी विविध प्रकारची माहिती मिळू शकेल.


या लिंक वर click करा

https://vishwakosh.marathi.gov.in/28433/ 

अर्थशास्त्र

मानवाला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसंपत्तीचा उपयोग करून मानवाच्या असंख्य गरजांची शक्य तितकी अधिक पूर्ती कशी करावी, याचा विचार करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अर्थशास्त्राच्या विकासाच्या प्रारंभीच्या काळात लोकांचे उपजीविकेचे दैनंदिन व्यवहार कसे चालतात, राष्ट्राची संपत्ती कशी वाढविता येईल यांसारख्या प्रश्नांचे विवेचन करणे हे अर्थशास्त्राचे कार्य आहे, असे ढोबळपणे समजले जात असे. या सर्व प्रश्नांच्या मागे असणारी मूलभूत समस्या स्पष्ट करण्याचे श्रेय प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रॉबिन्स, लायोनेल चार्ल्स रॉबिन्स यांचे आहे. ‘मानवाच्या अमर्याद गरजा आणि त्या भागविण्यासाठी उपलब्ध असलेली मर्यादित परंतु विविध उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी व्यवहाराचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय’, रॉबिन्स यांनी केलेल्या व्याख्येमुळे अर्थशास्त्रविषयक विचारांत अधिक स्पष्टता आली.

मानवाच्या गरजा या अमर्याद असतात. गरज, म्हणजे इच्छा, अमर्याद असणे हा एक मानवी मनाचा धर्म आहे. या सर्व गरजा पूर्णपणे भागू शकतील अशी साधनसामग्री मानवाला उपलब्ध नसते. ज्या गरजा काही प्रमाणात भागविता येणे शक्य असते, त्यांच्याही बाबतीत उपलब्ध निसर्गदत्त साधनसामग्रीवर मानवाला आपल्याकडे उपलब्ध असलेली मर्यादित श्रमशक्ती वापरावी लागते. मानवी श्रमाचा वापर न करता मानवाच्या गरजा पूर्णपणे आणि नीटपणे भागू शकतील, अशी फारच थोडी साधनसामग्री निसर्गाने मुक्तहस्ताने मानवाला दिली आहे. उदा., हवा, प्रकाश इत्यादी; तरी हवेचीदेखील शीतोष्णता सुसह्य व्हावी यासाठी काही तजवीज करावी लागते. निदान अशा सुसह्य हवेच्या प्रदेशात जाऊन वास्तव्य करावे लागते किंवा काही पशुपक्ष्यांप्रमाणे ऋतुमानाप्रमाणे स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी लागते. प्रकाशाची तजवीज अंधाऱ्‍या रात्री करावी लागते. मानव आपल्या बुद्धीच्या जोरावर निसर्गसंपत्तीचे नवनवे साठे उपलब्ध करून घेऊ शकतो, ही गोष्ट खरी. उद्या चंद्र व मंगळ यांसारख्या काही ग्रहगोलांवरूनही तो मूल्यवान खनिज द्रव्ये आणू शकेल; परंतु असा प्रयत्न कितीही वाढविला, तरी त्याला निसर्गाने घातलेली मर्यादा ही अखेर राहणारच.

या मर्यादित साधनसामग्रीच्या आधारे आपल्या मनातील अमर्याद भौतिक सुखांची इच्छा पूर्ण करण्याची मानवाची धडपड असते. ज्यांनी आपल्या ऐहिक सुखोपभोगाच्या लालसेवर स्वाभाविक विजय मिळविलेला आहे, असे काही उच्च कोटीतील साधुसंत वगळले, तर सर्वसाधारण मनुष्याविषयी हे विधान संपूर्ण सत्यार्थाने आपल्याला करता येईल. क्षितिज गाठण्यासाठी म्हणून क्षितिजाकडे चालू लागले, की ते उत्तरोत्तर पुढेच सरकत राहते, त्या पद्धतीचाच हा भौतिक इच्छापूर्तीचा प्रयत्न राहतो. यामुळे साधनसामग्री कितीही वाढत गेली, तरी मानवाच्या गरजा या तिच्याहीपुढे दौडत राहणे अटळ आहे. अशा परिस्थितीत मानवापुढे एक प्रश्न उपस्थित होतो. उपलब्ध असलेली साधनसामग्री विविध गरजांच्या पूर्तीसाठी वापरण्याची शक्यता असते. ही मर्यादित साधनसामग्री अमर्याद गरजांपैकी कोणत्या गरजा किती प्रमाणात पूर्ण करण्यासाठी वापरली जावी, हे त्या प्रश्नाचे स्वरूप होय. हेच आर्थिक प्रश्नाचे स्वरूप होय. आपल्याला उपलब्ध असणारा वेळ व श्रमशक्ती ही शिकार करण्यासाठी किती प्रमाणात वापरावी व फुले गोळा करण्यासाठी किती प्रमाणात वापरावी, याचा ज्या वेळी आदिमानवाने आपल्या मनाशी प्रकट-अप्रकट विचार केला असेल, त्या वेळी तो या दृष्टीने आर्थिक प्रश्नाचाच विचार करीत होता. आज मानवापुढे उभ्या असणाऱ्या आर्थिक प्रश्नाचे मूलभूत स्वरूप हेच आहे; मात्र सध्याच्या आपल्या समाजव्यवस्थेत हे आर्थिक व्यवहार कितीतरी अधिक गुंतागुंतीचे झालेले आहेत इतकेच. रॉबिन्स यांनी स्पष्ट केलेले आर्थिक प्रश्नाचे मूलभूत स्वरूप हे असे आहे. हा प्रश्न मानवासमोर त्याच्या आदिकालापासून उभा राहत आला आहे व तो मानवजातीसमोर निरंतर उभा राहणार आहे.

या लिंक ला प्रेस करा

https://marathivishwakosh.org/26633/ 

Friday 12 March 2021

छत्रपति संभाजी महाराज


संभाजी, छत्रपति : (१४ मे १६५७-११ मार्च १६८९). छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठयांच्या गादीवर आलेले हे दुसरे छत्रपती. हौतात्म्यामुळे अजरामर झालेले एक पराक्रमी पुरूष. त्यांचा जन्म  छ. शिवाजी महाराज व सईबाई यांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर (पुणे जिल्हा) झाला. त्यांना तीन वडीलबहिणी होत्या. सईबाईंच्या अकाली मृत्यूनंतर (१६५९) त्यांचा सांभाळ आणि शिक्षण आजी जिजाबाईंनी केले. सभासद  व चिटणीसांच्या बखरींतून याविषयी तपशील आढळतात. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी त्यांना उत्तम शिक्षण दिले. केशवभटांनी त्यांना दंडनीती व प्रयोगरूप रामायण ऐकविले. शिवाय राजपुत्रास आवश्यक असे घोडयावर बसणे, शस्त्रविदया, तालीम, तिरंदाजी वगैरेंचे शिक्षण दिले. छ. संभाजींच्या दानपत्रावरून (२७ ऑगस्ट १६८०) त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. त्यांनी स्वतः लिहून घेतलेल्या तीन भागांतील बुधभूषण या गंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविदया यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. यात राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लगार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे. याशिवाय गागाभट्टांकडून नीतिपर समयनय हा गंथ (पोथी) त्यांनी लिहून घेतला (१६८१) आणि धर्म कल्पलता हा धर्मशास्त्रावरील गंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला (१६८२). युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजींची प्रशंसा केली आहे. संभाजीराजांचा विवाह पिलाजीराजे शिर्के यांची कन्या राजसबाईबरोबर झाला (१६६५). तिचे नाव येसूबाई ठेवण्यात आले. येसूबाईपासून कन्या भवानीबाई (१६७८) आणि पुत्र शिवाजी (१६८२- छत्रपती शाहू) ही दोन अपत्ये संभाजीराजांना झाली. चंपा ही त्यांची दुसरी राजपूत पत्नी. तिला माधोसिंग व उधोसिंग हे दोन मुलगे झाले. 

जादा माहितीसाठी खालील लिंक वर click करा

https://vishwakosh.marathi.gov.in/33946/ 

संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रे : दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता, सुरक्षितता आणि सहकार्य यांकरिता दि. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना. या संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे असून तिच्या सदस्यांची संख्या १९२ (२००७) होती. दुसऱ्या महायुद्धापूर्वीच ð राष्ट्रसंघ ही संघटना अनेक कारणांनी निष्प्रभ ठरली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरूवातीस (१९३९) इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांतील नेत्यांनी युद्धोत्तर काळातील समस्यांच्या सोडवणुकीचा विचार सुरू केला होता. रशिया व फ्रान्स या राष्ट्रांचे नेतेही या प्रक्रियेत सहभागी झाले. ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक्लिन रूझवेल्ट यांची अटलांटिक महासागरातील एका युद्धनौकेवर दि. १४ ऑगस्ट १९४१ रोजी भेट झाली. तीत त्यांनी युद्धाची उद्दिष्टे जाहीर केली. ती ‘ अटलांटिक सनद ’ या नावाने प्रसिद्ध आहे. याच बैठकीत युद्धोत्तर कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा मनोदय या नेत्यांनी व्यक्त केला. फ्रँक्लिन रूझवेल्ट यांनी या भावी संघटनेस ‘ संयुक्त राष्ट्र ’ ही संज्ञा सुचविली. पुढे शत्रू-राष्ट्रांविरूद्ध एकत्रित आलेल्या सव्वीस मित्र-राष्ट्रांनी अटलांटिक सनदेला पाठिंबा दर्शविला आणि दि. १ जानेवारी १९४२ रोजी प्रथमच ‘ संयुक्त राष्ट्रे ’ या संस्थेच्या अधिकृत स्थापनेस सहमती दर्शविली. जर्मनी-जपान-इटली या शत्रू-राष्ट्रांविरूद्धच्या दुसऱ्या महायुद्धातील सामूहिक कारवाईचा उल्लेख मित्र-राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रे असा केला होता. मॉस्को येथील दि. ३० ऑक्टोबर १९४३ च्या परिषदेच्या जाहीरनाम्यात चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सोव्हिएट रशिया आणि ग्रेट ब्रिटन यांनी राष्ट्रसंघाच्या जागी आंतरराष्ट्रीय संघटनेची निकड प्रतिपादिली. या चार राष्ट्रांनी डंबर्टन ओक्सच्या (वॉशिंग्टन डी. सी.) परिषदेत (सप्टेंबर-ऑक्टोबर १९४४) या नूतन संघटनेच्या सनदेचा अंतिम मसुदा (खर्डा) तयार केला. याल्टा परिषदेत (किमिया) स्टालिन, चर्चिल आणि रूझवेल्ट यांनी फेबुवारी १९४५ मध्ये असे ठरविले की, संयुक्त राष्ट्रांची सॅन फॅन्सिस्को येथे २५ एप्रिल १९४५ रोजी सर्व मित्र- -राष्ट्रांची बैठक घेऊन सनदेच्या कलमांना सहमती घ्यावयाची. त्याप्रमाणे उपस्थित ५० मित्र-राष्ट्रांच्या सॅन फॅन्सिस्को येथे दि. २५ एप्रिल ते २६ जून १९४५ दरम्यान अनेक बैठका झाल्या. त्यांवर सविस्तर चर्चा होऊन सुरक्षा मंडळाच्या रचनेसंबंधी निश्चित धोरण ठरविण्यात येऊन सनदेवर शिक्कामोर्तब झाले. या परिषदेस संस्थापित परिषद (फाउंडिंग कॉन्फरन्स) असे म्हणतात. या संघटनेची पहिली आमसभा लंडन (ग्रेट ब्रिटन) येथे दि. १० जानेवारी १९४६ रोजी भरली. तीत युद्धोत्तर योजनांविषयी आणि संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाविषयी साधकबाधक चर्चा होऊन ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात स्थायी स्वरूपात बांधण्याचे ठरले. त्यानंतर या बांधकामासाठी जॉन रॉकफेलर या धनाढय गृहस्थाने सु. ८५ दशलक्ष अमेरिकन डॉलर अशी भरघोस देणगी दिली आणि अमेरिकन शासनाने त्यात ६७ दशलक्ष डॉलर निर्व्याज रक्कम घातली. न्यूयॉर्क येथे सात हेक्टर क्षेत्रात कार्यालयाच्या भव्य वास्तू उभ्या राहिल्या (१९५२).


Click here More Information


https://vishwakosh.marathi.gov.in/33963/ 

Thursday 11 March 2021

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास

भारत इंग्रजी अंमलाखाली आल्यानंतर स्वातंत्र्य संपादनार्थ घडलेला इतिहास. बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा बंगालमधील प्लासी या गावाजवळ २३ जून १७५७ रोजी झालेल्या लढाईत [⟶ प्लासीची लढाई] ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पराभव केला आणि कलकत्ता शहर व २४ परगणा जिल्हा यांचे चिमुकले राज्य स्थापिले. या राज्याचा विस्तार शीख सत्ता नष्ट होईपर्यंत (१८४९) चालू राहिला. अखेरीस भारताच्या इतिहासातील एक सर्वांत मोठे व बलाढ्य असे ब्रिटिश साम्राज्य उभे राहिले . पाचही  खंडांत पसरलेल्या विशाल ब्रिटिश साम्राज्याचा हिंदी साम्राज्य हा एक भाग होता. त्याची इतरही अनेक वैशिष्टये होती : आधीच्या सर्व परकी राज्यकर्त्यांनी येथे स्थायिक होऊन भारतीय शेती व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे आर्थिक भरभराट होत राहिली. ब्रिटिश काळात परिस्थिती उलटी झाली. ग्रेट ब्रिटनमधील कारखान्यांत तयार होणाऱ्या मालाला भारत ही हुकमी बाजारपेठ मिळाली. त्यामुळे इथले उद्योग बुडाले, जमिनीचा सारा वाढला आणि शेतीसाठी दरवर्षी जी कर्जे घ्यावी लागत, त्यांचे लेखी व्यवहार सुरू झाले. या व्यवहारात निरक्षर शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या मालकीच्या बनल्या. देशाचा कोणत्या ना कोणत्या तरी भागात दुष्काळ आणि भूकबळी ही नित्याची बाब होऊन बसली.

click here

https://vishwakosh.marathi.gov.in/30096/ 

राष्ट्रसंघ :

राष्ट्रसंघ : आंतरराष्ट्रीय सुरक्षा व शांतता याच्या संवर्धनार्थ पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली जागतिक संघटना (२८ एप्रिल १९१९). तिची बीजे तत्पूर्वीच्या इंटरनॅशनल टेलिग्राफिक युनिअन (१८६५), युनिव्हर्सल पोस्टल युनिअन (१८७४), रेडक्रॉस (१८६३), हेग परिषदा, हेग ट्रॉइब्यूनल आदी संस्थांत आढळतात. व्हिएन्ना काँग्रेसनंतरच्या शंभर वर्षांच्या कालावधीत (१८१५ ते १९१४) राजनैतिक मसलतींद्वारा राष्ट्राराष्ट्रांतील युद्धे मर्यादित करण्यात बड्या राष्ट्रांना काही अंशी यश लाभले तरी या मसलती प्रासंगिक स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे गुप्त राजनयाच्या द्वारा चालू असलेल्या तत्त्वहीन राजकारणामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण संशय व तणाव यांनी ग्रस्त झाले होते. पहिल्या महायुद्धाच्या उद्रेकाने प्रस्थापित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील गंभीर दोष जगाच्या निदर्शनास आले आणि महायुद्धातील मानवी जीवन आणि संपत्ती यांचा अभूतपूर्व विनाश पाहून मुत्सद्दी आणि राजकीय विचारवंत यांनी सत्तासंतुलनाच्या राजकारणास पर्याय म्हणून सामूहिक सुरक्षिततेच्या तत्त्वाचा पुरस्कार केला. प्रकट राजनय आणि सामूहिक सुरक्षितता ही आंतरराष्ट्रीय राजकारणाची नवी सूत्रे ठरली. राष्ट्रसंघाच्या रूपाने ती काही अंशी मूर्त स्वरूपात आली.

Click link


https://vishwakosh.marathi.gov.in/31258/ 

महायुद्ध, दुसरे : (१ सप्टेंबर १९३९ ते २ सप्टेंबर १९४५)

महायुद्ध, दुसरे : (१ सप्टेंबर १९३९ ते २ सप्टेंबर १९४५). या दुसऱ्या  जागतिक महायुद्धाचा पाया पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस घातला गेला. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी पहिले महायुद्ध आटोपले. १८ जानेवारी १९१९ रोजी पॅरिस येथे शांतता परिषद झाली. २८ जून १९१९ रोजी झालेला ⇨व्हर्सायचा तह याच्या कडक अटींचा तडाखा म्हणजे त्यांच्या पराजयाच्या खोल जखमेवर चोळलेले मीठ होते, या तहामुळे सगळ्या वसाहती गमवाव्या लागल्या. पहिल्या महायुद्धात काबीज केलेल्या ॲल्सेस-लॉरेन प्रांत परत द्यावा लागला. झार प्रांताला १९३९ सालापर्यंत आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. डॅन्झिग हे मुक्त शहर म्हणून जाहीर करण्यात आले. ऱ्हाईन खोऱ्यातील सुपीक व समृद्ध प्रदेश दोस्तांच्या काबूत गेला. हानीपूर्तीची रक्कम ६ अब्ज पौंड ठरविण्यात आली तिची फेड झाली नाही म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष प्वँकारेच्या अमदानीत ११ जानेवारी १९२३ रोजी कोळसा, लोखंड व उद्योग यांनी समृद्ध असलेला रूर प्रांत फ्रांन्स ताब्यात घेतला आपण हारलो हा जर्मन राष्ट्राला आश्चर्याचा व नामुष्कीचा धक्का होता. त्यामुळे १९२० साली स्थापन केलेल्या नाझी पक्षाचा पुढारी ⇨ॲडॉल्फ हिटलरने व्हर्साय तहाला गुलामगिरीचा तह म्हटले. या तहामुळे चिडलेल्या जर्मनांचा संताप पंधरा वर्षांच्या आत हिटलरने शिगेला पोहचविला.

click below link


https://vishwakosh.marathi.gov.in/28561/ 

Heterogeneous Catalysis and Catalytic Processes IIT Delhi, , Prof. K.K. Pant



Click here and see the video catalysis and catalytic process

https://freevideolectures.com/course/3326/heterogeneous-catalysis-and-catalytic-processes