Friday 28 August 2020

खल्‌जी घराणे

खल्‌जी घराणे : खल्‌जी लोकांनी आपले वर्चस्व वाढवून दिल्ली येथे १२९०–१३२० ह्या काळात स‌त्ता प्रस्थापित केली. अफगाणिस्तानातील हे खल्‌जी मूळचे तुर्क असले, तरी हिंदुस्थानातील तुर्क त्यांना अफगाण स‌मजत. मामलूक सुलतानांच्या पडत्या काळात खल्‌जी लोक बलवान झाले. फीरूझशाह खल्‌जी हा खल्‌जी घराण्याचा संस्थापक. या घराण्यात तीस वर्षांच्या काळात एकूण स‌हा राज्यकर्ते होऊन गेले. (१) जलालुद्दीन फीरूझशाह खल्‌जी (१२९०–१२९६), (२) रूक्नुद्दीन इब्राहीम (१२९६-तीन महिने), (३) अलाउद्दीन मुहम्मद खल्‌जी (१२९६–१३१६), (४) शिहाबुद्दीन उमर (१३१६-सहा महिने), (५) कुत्बुद्दीन मुबारकशाह (१३१६–१३२०) व (६) खुस्रवशाह (१३२०).

अधीक माहितीसाठी खालील लिंकवर click करा

https://vishwakosh.marathi.gov.in/21844/ 

गुलाम घराणे

गुलाम घराणे : तेराव्या शतकात सु. १२०६ ते १२९० च्या दरम्यान दिल्ली येथे राज्य स्थापन करणारा तुर्की गुलाम ⇨कुत्बुद्दीन ऐबक  ह्याच्या घराण्यास गुलाम घराणे किंवा गुलाम वंश म्हणतात. या घराण्यातील दहा सुलतानांपैकी ऐबक, ⇨ अल्तमश  व ⇨बल्बन  हे तीनच राज्यकर्ते गुलाम होते. उरलेले सर्व दास्यमुक्त झालेले होते. त्यामुळे यास गुलाम घराणे म्हणणे फारसे सयुक्तिक वाटत नाही. ऐबकला दास्यातून मुक्त होताच अधिकार प्राप्त झाला होता. अल्तमश व बल्बन हे लहान वयातच दास्यमुक्त झाले होते. दहा राज्यकर्त्यांपैकी तीन वेगवेगळ्या घराण्यांतील होते. मध्ययुगीन तुर्की प्रघाताप्रमाणे ह्या सुलतानांना सुलतान म्हणणेही योग्य नाही.

अधीक माहितीसाठी खालीललिंकवर click कर

https://vishwakosh.marathi.gov.in/22398/ 

Monday 17 August 2020

भोसले घराणे


भोसले घराणे: सतराव्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थो👉र मराठा घराणे. भोसले कुळाच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून (१६७४) भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे (राजपूत) कुळाशी संबंध जोडण्यात आला. मराठी बखरींनी पुढे तोच क्रम चालू ठेविला. मुसलमानांचे उत्तर हिंदुस्थानात वर्चस्व वाढले, तेव्हा भोसले दक्षिणेत आले, असे बखरींचेच प्रतिपादन आहे. शिसोदे–भोसले संबंध दाखविणारा स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा नाही. या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष बाबाजी भोसले. त्याचे दोन पुत्र मालोजी (मृ, १६०७) आणि विठोजी हे वेरुळ-घृष्णेश्वर भागात निजामशाहीच्या  आश्रयाने प्रथम उदयास आले. पुणे जिल्ह्यातील पुणे व सुपे या जहागिरी मालोजीकडे होत्या. मालोजीस दोन पुत्र होते : ⇨ शहाजी (१६०२–६४) आणि शरीफजी (ॽ -१६२४). त्यांपैकी शहाजी हा प्रथम निजामशाहीत आणि नंतर आदिलशाहीत पराक्रम करून नावलौकिकास चढला. आदिलशाहने त्याची नेमणूक कर्नाटकात केली. त्याने बंगलोरला मोठी जहागीर संपादन केली. त्याचे उर्वरित आयुष्य कर्नाटकात आदिलशाहीच्या सेवेत, पण मोठ्या वैभवात गेले. राधामाधवविलासचंपू या समकालीन काव्यग्रंथावरून शहाजीच्या योग्यतेची कल्पना येते.

        click link⇓            https://vishwakosh.marathi.gov.in/28254/ 

Friday 14 August 2020

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास

 


बलसागर भारत होवो मराठी 👉   click link⇓⇓⇓⇓

https://www.youtube.com/watch?v=Pcyxd5UhlDA

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास

Click Link

          👉   https://vishwakosh.marathi.gov.in/30096/


Saturday 1 August 2020

अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe)



साठे, अण्णाभाऊ : (१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ ). कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर, ख्यातनाम मराठी साहित्यिक. अण्णाभाऊंचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगावचा, उपेक्षित समजल्या गेलेल्या मातंग समाजातील. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा जि. सांगली ). त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करीत होतेच, तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. तमाशातून जुन्या चालीचा सुरवातीचा साठा अण्णाभाऊंनी आत्मसात केला. मुंबईत परतताच त्यांना मॅक्झिम गोर्कीचे साहित्य वाचायला मिळाले. लिखाणाची उर्मी त्यांना याच साहित्यानं दिली. तो काळ १९४२ च्या चळवळीचा. ते स्वातंत्र्य समरांगणात सहभागी झाले, म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्यावर पकड वारण्ट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले, त्याच काळात त्यांची भेट शाहीर अमर शेख, द. ना. गव्हाणकरांशी झाली. आपसातले हेवेदावे, गरीब जनतेला, शेतकऱ्यांना मिळणारा, छळणारा दारिद्र्याचा झगडा त्यांनी न्याहाळला होता. त्यातच मॅक्झिम गोर्कीच्या साहित्यानं प्रभावित झालेल्या त्यांच्या अंतरीच्या उर्मीं प्रतिभेला बहर आला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘ लाल बावटा ’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्ध झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
click link

टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर

टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर : (२३ जुलै १८५६–१ ऑगस्ट १९२०). थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव (ता. दापोली, जि. रतिनागिरी). चिखलगावची खोतीदारी त्यांच्याकडे होती. पणजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळात मानाची जागा मिळवली होती. आजोबा रामचंद्रपंत यांनी उत्तर आयुष्यात संन्यास घेतला. टिळकांचे वडील गंगाधरपंत व आई पार्वतीबाई. गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बाळ गंगाधऱ टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्यास झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्यास आले. पुण्यास आल्यावर थोड्याच दिवसांत टिळकांची आई मरण पावली आणि गंगाधरपंतांची बदलीही ठाण्यास झाली. तथापि पुण्यात राहूनच ते १८७२ मध्ये मॅट्रिक झाले. तत्पूर्वी १८७१ मध्येच त्यांचा कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई (माहेरचे नाव तापीबाई) यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते. त्यांचे नातू ज. श्री. टिळक हे केसरीचे विद्यमान संपादक असून खासदार आहेत. गंगाधरपंत १८७२ मध्ये निधन पावले. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी काही रक्कम ठेवली होती. त्यामुळे टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये नाव घालते. महाविद्यालयातील पहिल्या वर्षी नियमित व्यायाम करून प्रकृती सुदृढ व निकोप राखण्यावर त्यांनी भर दिला.
Click link
















ईद उल ज़ुहा

https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%88%E0%A4%A6_%E0%A4%89%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BC%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BE#gsc.tab=0