Thursday 11 February 2021

संग्रहालये


संग्रहालये : विविध विषयांतर्गत दुर्मिळ व नावीन्यपूर्ण वस्तू आणि सामग्री यांचे परिरक्षण, जतन, संवर्धन, प्रदर्शन व अर्थबोधन करणारी एक संस्था. संग्रहालय किंवा वस्तुसंग्रहालय हा म्यूझीयम या इंग्रजी संज्ञेसाठी ( शब्दासाठी ) वापरलेला मराठी प्रतिशब्द होय. म्यूझीयम हा शब्द मूळ माऊझयॉन (mouseion) या ग्रीक शब्दापासून बनला असून प्रथम तो लॅटिनमध्ये आला व पुढे तो इंग्रजीत म्यूझीयम म्हणून प्रविष्ट झाला. माऊझयॉन या ग्रीक शब्दाचा अर्थ म्यूझेस या कला व विज्ञानाच्या देवतेचे अधिष्ठान किंवा मंदिर असा आहे. अर्थबोधन व परिरक्षण ( संवर्धन ) या दोन निकट ( जुळ्या ) संकल्पनांची उत्पत्ती, हा संग्रहालयाचा मूलभूत स्रोत ( पाया ) असून तो मानवाची चिकित्सा व जिज्ञासू वृत्ती आणि वस्तुसंग्रह करण्याची नैसर्गिक सहज प्रवृत्ती यांतून दृग्गोचर होतो. नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारांशी संबंधित बहुविध विषय उदा., कला आणि विमानशास्त्र, धर्म आणि कीडा, जीवशास्त्र आणि संगीत- शास्त्र, नैसर्गिक विज्ञाने आणि सामाजिक शास्त्रे, असे विविध क्षेत्रांतील विषय संग्रहालयांच्या व्यवस्थापनाखाली ( अखत्यारीत ) येतात. संग्रहा- लयांचा उद्देश शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक असा दुहेरी आहे. विदयार्थी, अभ्यासक व संशोधक यांबरोबरच सामान्य प्रजाजनांना संग्रहालये सेवा देतात. यथार्थतेच्या व वास्तवतेच्या दृष्टिकोनातून त्यांचा आशय ज्ञानार्जन असला, तरी दृष्टिसुख ( दृष्टीला आव्हान देणे ) याचाही तेथे गांभीर्याने विचार केला जातो. संग्रहालयांमध्ये विचारांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य आहे, तद्वतच भावनात्मक आवाहनही ती करतात. सत्यतेचा वृत्तांत लेखक ( वाकनवीस ) म्हणून संग्रहालयांचा विचार केला जावा आणि मानवी जीवनातील सद्‌गुणाचा गुणधर्मांचा सदुपयोग करणारी अगेसर संस्था म्हणून त्यास स्थान द्यावे, असा विचार तत्संबंधी अलीकडे व्यक्त केला जातो कारण संग्रहालये ही सांस्कृतिक वारसाची अधिरक्षक (पालक) व अन्वेषक ( विवरणकर्ता ) आहेत. ती मानवप्राणी व नैसर्गिक इतिहास, समूह विकास, फावला वेळ किंवा मनोरंजन यांच्या सुविधांची सामाजिक साधने होत.

इतिहास : आज अभिप्रेत असलेली संग्रहालयाची विकसित संकल्पना प्राचीन काळी अस्तित्वात नसावी कारण आतापर्यंतच्या पुरा- तत्त्वीय व ऐतिहासिक पुराव्यांत तत्संबंधी कोणत्याही प्रकारचे दाखले मिळाले नाहीत तथापि काही प्राचीन संस्कृतींमधील राजांनी वस्तुसंग्रह केल्याचे पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्या संस्कृत्यांपैकी बॅबिलोनिया, चीन येथील राजे तसेच ग्रीक व रोमन संस्कृतींतील शपथ-दान म्हणून केलेल्या वस्तू मंदिरांत संग्रहित करीत असल्याचे दाखले मिळतात. एवढेच नव्हे तर त्यांच्यासाठी स्वतंत्र वास्तूही उभारीत असत. त्यांत कलात्मक वस्तूंबरोबर काही नैसर्गिक दुर्मिळ वस्तू तसेच साम्राज्याच्या इतर भागांतून आणलेल्या परदेशी नावीन्यपूर्ण वस्तू असत आणि त्या अल्पसे शुल्क देऊन सामान्य जनांनाही पाहता येत असत. ⇨चार्ल्स लेनर्ड वुली   या पुरातत्त्ववेत्त्यांनी बॅबिलोनियातील ⇨अर   येथे उत्खनन केले. त्यांना इ. स. पू. सहाव्या शतकातील काही अवशेष मिळाले. त्या अवशेषांवरून त्यांनी असे अनुमान काढले आहे की, तत्कालीन राजे नेबुकॅड्नेझर आणि नेबोनिडस या बॅबिलोनियन राजांना काही जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद होता. एवढेच नव्हे तर तेथील एका मंदिराजवळील दालनात विटांवर लिहिलेली यादी सापडली. वुली यांच्या मते ती संग्रहातील वस्तूंची यादी असावी. नेबोनिडसची कन्या व तत्कालीन उपाध्यायीण एन्निगल्डी-नन्ना ही येथे एक विदयालय चालवीत असावी आणि तेथे एक लहान शैक्षणिक संग्रहालय असावे. या संग्रहालयापूर्वी ग्रीसमधील अथेन्स शहरात अकॉपलिस येथे इ. स. पू. पाचव्या शतकात ‘ पिनाकोथेकी ’ या दालनात म्यूझीयम या संकल्पनेशी सादृश दर्शविणारा संग्रह केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यात देवदेवतांची चित्रे होती. मॅसिडोनियन वंशातील पहिले टॉलेमी-सोटर ( इ. स. पू. ३६४-२८४) यांनी ॲलेक्झांडि्नया ( ईजिप्त ) येथे राजधानी स्थापून तेथे एक वस्तुसंग्रहालय व गंथालय स्थापन केले. हे संग्रहालय त्यांच्या राजप्रासादाला जोडून असलेल्या वास्तूत होते. त्यात खगोल- शास्त्रीय व शस्त्रकियेची साधने, प्राण्यांचे व वनस्पतींचे दुर्मिळ नमुने, प्राण्यांची कातडी, विचारवंतांचे पुतळे, तसबिरी, चित्रे, हस्तिदंती वस्तू इत्यादींचा संग्रह केला होता. कदाचित जगातील हे पहिले आधुनिक म्यूझीयम या संकल्पनेशी मिळतेजुळते संग्रहालय म्हणता येईल. या ग्रहालयाला प्रथमच म्यूझीयम ही संज्ञा त्यावेळी देण्यात आली होती. टॉलेमी-सोटर स्वत: विव्दान होते आणि त्यांनी अलेक्झांडरच्या स्वाऱ्यांचा इतिहास लिहिला. उतारवयात त्यांनी ‘सेरापीज’ नावाचा एक धर्मपंथ सुरू केला. त्यांच्या गंथालयाचा व्यवस्थापक थोर ग्रीक व्याकरणकार झनॉडटस ( इ. स. पू. ३२५-२६०) होते. त्यांनी तेथील काव्यसंग्रहाची भाषा- शास्त्राच्या आधारे विभागणी केली होती. या गंथालयात सु. ५ लाख गंथ असावेत, अशी वदंता आहे. येथील गुंडाळीच्या रूपातील गंथांच्या प्रती तयार करून त्या इतर गंथालयांना पुरविण्याची सोय तेथे होती. ईजिप्त- मधील या इतिहासप्रसिद्ध गंथालयातील सु. ४० हजार गंथ जुलिअस  सीझर यांच्या सैनिकांनी प्रथम नष्ट केले ( इ. स. ४७). पुढे रोमच्या मार्क अँटनी यांनी ईजिप्तची राणी क्लीओपात्रा हिला भेट म्हणून दिलेल्या गंथामुळे ते थोडे सावरले, पण पुन्हा नंतरच्या रोमन समाटांनी आणि उमर खलीफा यांनी ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

click here more information
https://vishwakosh.marathi.gov.in/33988/ 

No comments:

Post a Comment