Saturday 13 February 2021

पुराभिलेखविद्या


पुराभिलेखविद्या इतिहासकाली लिहिलेला मजकूर म्हणजेच पुराभिलेख. असे लेखन इतिहासकालात राजवंश, सरंजामदार, धार्मिक संस्था, व्यापारी, प्रवासी, धर्मगुरु इत्यादींनी केले असून त्यांनी व्यवहार लिहून ठेवले आणि त्याचे रक्षण केले. त्यांच्या जतनास व अभ्यासास पुराभिलेखविद्या ही संज्ञा देतात. यूरोपमधील बहुतेक देशांत अशा कागदपत्रांच्या संग्रहास रेकॉर्ड (दप्तर) आणि रेकॉर्ड ऑफिस (दप्तरखाना) ह्या संज्ञा आहेत. दप्तरखान्यास अभिलेखागार या नावानेही संबोधिले जाते. हे जुने लेख सुरक्षित ठेवण्याची पद्धती, असुरक्षित लेखांना सुरक्षित करण्याची पद्धती, सुरक्षित ठेवलेले लेख वाचून त्यांचे सारांश काढणे आणि अन्य तऱ्हेने ते लेख रोजचा कारभार किंवा इतिहासलेखन यांस कसे उपयोगी पडतील, याचा विचार करून त्याप्रमाणे व्यवस्था करणे, या अनेक गोष्टींचा पुराभिलेखविद्या या विषयात समावेश होतो. हे काम ज्या ठिकाणी चालते त्याला पुराभिलेखागार किंवा अभिलेखागार असे म्हमतात. क्वचित काही ठिकाणी यास लेखागार असेही म्हटले आहे. कोणतेही राज्य किंवा कंपनी वा संस्था अगर दक्षतापूर्वक काम करणारी एखादी व्यक्ती या सर्वांना आपले व्यवहार नीट चालावे, म्हणून आपापली अभिलेखागारे उभारावी लागतात. अशी लेखागारे आधुनिक काळात अनेक आहेत. पूर्वीही अशी लेखागारे असावी

https://vishwakosh.marathi.gov.in/21009/ 

Click above Link

No comments:

Post a Comment