Friday 31 December 2021

जबाबदाऱ्या पेलताना..


इंद्रा नूयी यांचं हे आत्मकथन रंजक शैलीत लिहिलं गेलं आहेच, पण त्यांचं कर्तृत्व लिखाणात नव्हे, तर व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पार पाडण्यात दिसून येतं..

Click link for more information

https://www.loksatta.com/sampadkiya/athour-mapia/book-review-my-life-in-full-work-family-and-our-future-by-sukumar-shidore-zws-70-2742744/ 

Friday 17 December 2021

मोगल काळ

https://vishwakosh.marathi.gov.in/30517/ 

कोकणातील मंदिर वारसावास्तू आणि काष्ठशिल्पाकृती

कोकण प्रदेशातील मंदिर बांधकामासह त्यातील काष्ठशिल्पाकृती हा आमच्या प्राचीन कलेचा वारसा आहे. भाविक- पर्यटक व अभ्यासकांचे ते आकर्षण आहे. पण पडझड होत चाललेल्या या काष्ठशिल्पाधारी मंदिरांची आजची अवस्था पाहून मन खंतावते. पुरातन मंदिराच्या नवीन बांधणी, नूतनीकरणाच्या नावाखाली निर्माण होत ही मंदिरे नवीन चेहरा घेऊन उभारली जात आहेत. त्यात आकर्षकतेसह स्वयंपूर्ण सुसज्जपणाही असेल, पण आमच्या पूर्वापारच्या संस्कृतीचा मापदंड ठरलेली पारंपरिक कलाकृती नामशेष होत चालली आहे. हे थांबायलाच हवे नाहीतर आधुनिक मार्बलयुक्त, चकाचक मंदिरे उभारताना मूळच्या मंदिरावर देवदुर्लभ काष्ठशिल्पाकृती होती हे पुढील पिढीला सांगणारी आजची जाणकार मंडळीही तेव्हा नसणार.

Click link More information

https://www.loksatta.com/vasturang/vastu-lekh/heritage-temple-in-konkan-1246377/ 

वाडा

वाडा : एक गृह-वास्तुप्रकार. धनिक मालकाच्या आकाराने बऱ्याच मोठ्या असलेल्या निवासस्थानास मराठीत ‘वाडा’ हा काहीसा सन्मानदर्शक शब्द वापरतात. निवासास आवश्यक अशी आतिथ्यगृह, विश्रामस्थान, भोजनगृह, दालने मोठ्या आकाराच्या उघड्या चौकांभोवती बांधण्यात येत. सामान्यतः दोन चौक असत परंतु उत्तर पेशवाईत सात चौक असणारे वाडे बांधण्यात आले (आता नष्टप्राय झालेला मोरोबादादाचा वाडा, पुणे). चौकांमुळे  सर्व दालनांत हवा व उजेड भरपूर  प्रमाणात मिळत असत.  

खेड-शिवापूर (जि. पुणे) येथील वाडा : (१) मुखदर्शन, (२) आराखडा.
खेड-शिवापूर (जि. पुणे) येथील वाडा : (१) मुखदर्शन, (२) आराखडा.

दालनांची विभागणी पंरपरागत पद्धतीने होई. मोठ्या दरवाज्यातून पहिल्या चौकात प्रवेश मिळे. समोरच्या बाजूला वाड्याच्या मालकाची बैठक असे. डाव्या-उजव्या हातांच्या ओवऱ्यांत कचेरी, म्हणजे कारकुनांचा फड असे. आल्यागेल्यांचे स्वागत येथेच होई. याच चौकात बैठकीच्या ओवरीच्या उजवीकडे देवघर असे. बहुधा त्याभोवती लाकडी जाळी बसविलेली असे. या ओवरीतून आत गेल्यावर दोन्ही बाजूंस माडीवर जाण्यासाठी जिने असत. तसेच पुढे गेल्यावर मध्यघर किंवा माजघर (घरातील स्त्रियांचे विश्रांतिस्थान) त्यातून पुढे गेल्यावर दुसरा किंवा आतला चौक, त्याभोवतीच्या दालनात स्वयंपाकघर, जेवणघर अशी व्यवस्था असे. याच चौकात तुळशीवृंदावन असे.  

वरच्या मजल्यावर ‘सदर’ किंवा सभेचा दिवाणखाना असे. यात कीर्तन, नृत्य, गायन इ. कार्यक्रम होत. या दालनाच्या भिंतीत घरातील स्त्रियांना कार्यक्रम पाहण्यासाठी जाळ्या ठेवल्या जात. त्यांतल्या त्यांत संपन्न व रसिक गृहस्थांच्या वाड्यांतून ‘आरसेमहाल’, ‘चित्रशाला’, अशी वेगळी दालने असत (अदालत वाडा, सातारा पटवर्धन वाडा, तासगाव रंगमहाल, चांदवड ). याच मजल्यावर शय्यागृहे व क्वचित  खजिन्यांची खोली असे (तासगाव नगरकर वाडा, कान्हूर). सामान्यपणे वाडे दुमजली असत व एखाद्या भागावर गच्ची ठेवून बाकी भागावर कौलारू छपरे घालीत. जिन्यालगतच्या एकदोन खोल्या जास्त मजल्यांच्या करत. त्यांत झोपाळे इ. असत व मालकाच्या आमोद-प्रमोदासाठी त्या बांधत (रास्ते वाडा, पुणे). शनिवार वाड्याला (पुणे) सात मजले होते ते या प्रकारचे. 

वाड्याचा तळमजला भक्कम दगडी बांधणीचा असे. बऱ्याच ठिकाणी पायाची जागा दगडी बळदांनी किंवा तळघरांनी घेतलेली असे. वाड्याची रचना मुख्यतः लाकडी खांब व तुळया यांच्या सांगाड्याभोवती होत असे. वरच्या मजल्याचे बांधकाम विटांचे असे व भिंती बऱ्याच जाड, पुष्कळदा पाच फुट रुंदीच्या असत.  

सजावटीसाठी दोन-तीन प्रकार वापरीत. लाकडी खांब, तुळया, हस्त (ब्रॅकेट), पटई यांवर हरप्रकारचे कोरीव काम करण्यात येई. यासाठी वेलपत्ती, पक्ष्यांच्या आकृत्या यांचा वापर होई. सुरूचे खांब व मेहेरपीच्या कमानी यांचा वापर सदरेसाठी होई. तेलपाणी देऊन लाकूडकाम लखलखीत ठेवीत. भिंतींत लहानमोठ्या आकारांचे कमानदार कोनाडे कोरण्यात येत आणि त्यांत तसेच भिंतींच्या पृष्ठांवर रंगीत चित्रेही काढण्यात येत. चित्रांत मुख्यतः दशावतार, कृष्णलीला, द्रौपदीस्वयंवर, शिकार किंवा युद्धे यांचे देखावे असत (रंगमहाल, चांदवड निपाणकर–देसाई वाडा, निपाणी वाईचा रास्ते वाडा). 


अठराव्या शतकात पुण्यासारख्या  ठिकाणी कात्रजसारख्या घाटावरून भूमिगत नळातून पाणी आणल्यावर चौकातून हौद, कारंजी, बागा दिसू लागल्या.  अन्यथा वाड्यालगत विहीर असे व तीतून पाणी मिळत असे. वाड्यापासून दूर अंतरावर स्वच्छतागृहे बांधीत.  

उत्तर पेशवाईत वाड्याभोवती तट बांधून मोठाले कमानदार दरवाजे व त्यांवर नगारखाने बांधण्यात येऊ लागले. वाड्याचे रूपांतर गढीत झाले. 

उत्तर पेशवाईत गुजरात व दिल्ली अशा दोन शैली, मुख्यतः लाकूडकामाच्या आधारे पृथक्‌पणे दिसतात. परंतु वाड्यांची विधाने, बांधकामाचे साहित्य व रचनातंत्र दोन्हींनाही समानच होती. महाराष्ट्रात पेशवेकाळात अनेक वाडे उभे राहिले. निदान अगदी अलीकडेपर्यंत अवशिष्ट असलेले वाडे त्या काळातले होते. तथापि त्यापेक्षा प्राचीन वाडे (चौदाव्या पंधराव्या शतकांतील) पैठण येथे आढळतात. प्राचीन संस्कृत साहित्यात (उदा. बाणभट्टाची कादंबरीसमरांगण सूत्रधार इ.) येणारी वाड्यांनी वर्णने ताडून पाहता, वाड्याचे विधान परंपरागत, निदान गुप्तकाळापर्यंत तरी मागे जाणारे असावे, असे दिसते. बौद्ध लेण्यांतील ⇨विहार हेही मोठ्या वाड्याच्या विधानाचे पूर्वज म्हणता येतात. प्राचीन ग्रीक-रोमन संस्कृतींत उघड्या चौकाभोवती घरे बांधण्याची पद्धत होती, त्यामुळे हवा खेळती राहून सर्व दालनांना उजेडही मिळे. थोडक्यात आज ‘वाडा’ या शब्दाने डोळ्यासमोर येणारा ⇨गृहवास्तुप्रकार प्राचीन व सार्वत्रिक परंपरेचा अलीकडील आविष्कार म्हणता येईल. 

https://vishwakosh.marathi.gov.in/32401/ 

वाड्यांचा इतिहास

वाड्यांचा इतिहास : वाडा हा महाराष्ट्रात विकसित झालेला परंपरागत निवासस्थानाचा प्रकार आहे. हा वास्तुप्रकार पेशवेकाळात उदयास आला. मराठा साम्राज्यात साधारणपणे सतराव्या शतकाच्या शेवटी ते १८१८ पर्यंत (पेशवे ब्रिटिशांच्या अधीन होईपर्यंत) वाडासंस्कृती पुण्यात भरभराटीस आली. पुढे १९ व्या शतकातही वाडे बांधले गेले, परंतु पेशवेकाळातच वाड्यांची खऱ्या अर्थाने भरभराट झाली. दुसरा पेशवा बाजीराव (पहिला) याने पुण्यास राजधानी हलविली. बाजीरावाने १७३०-३२ च्या सुमारास शनिवार– वाडा हा राजेशाही वाडा बांधला. त्यानंतर अठराव्या शतकाच्या मध्यावर पुण्यात अनेक मंदिरे, घाट आणि वाडे बांधले गेले. बाजीराव (पहिला) याने पुण्याला राजधानी बनविले, त्याआधी पुण्यात सहा पेठा अस्तित्वात होत्या. पेठ बांधणे हा सरकारी आणि खाजगी असा संयुक्त उपक्रम असे. त्याकाळी राज्यकर्ते आपल्यातल्या विश्वासू माणसांस पेठ बांधण्याचा हक्क, परवानगी आणि जबाबदारी द्यायचे. पेठा बांधण्याचे काम सरकारी नियोजन आणि तात्कालिक निर्णय यातून पूर्णरुपास यायचे. पेशवाईच्या काळात पेठा बांधण्याच्या कामाला औपचारिक स्वरूप आले. या काळात पेठा बांधण्याचे शेटे आणि शेटे-महाजन या मंडळीना देण्यात येऊ लागले. त्यांच्या कामाचं स्वरूप हे लोकोपयोगी सुविधा पुरवण्याचं असे. रस्ते बांधणी करणे, जागेची बांधकामयोग्य विभागणी  करणे, सोयीसुविधा पुरवणे, तसंच खाजगी जागा विकसित करण्यासाठी आणि वसविण्यासाठी लोकांना आमंत्रित करणे, हे शेटे आणि शेटे-महाजन यांच्या कामाचं स्वरूप असे. त्यांच्या कामाचा मुख्य भाग म्हणजे स्थानिक कारागिरांच्या वस्तूंसाठी आणि आयात केलेल्या मालासाठी बाजारपेठ वसविणे. या शेटे  मंडळींना कारागीर आणि व्यापारी यांच्याकडून माल किंवा नगद स्वरूपात करवसुलीचा अधिकार होता. काही पेठा निवासी पेठा होत्या तर काही पेठा मुख्यत्वेकरून बाजारपेठा होत्या, उदा., कसबा पेठ, सोमवारपेठ, सदाशिवपेठ या निवासी पेठा तर मलकापूर आणि बुधवारपेठ या बाजार पेठा. तर विसापूर ही लष्करी छावणी होती.

https://marathivishwakosh.org/35302/ 

मंदिर कसे पाहावे?

आपल्याकडे धार्मिक पर्यटन मोठय़ा प्रमाणात केले जात असले तरी विशिष्ट देवळांत जाऊन हारफुले वाहणे, मूर्तीसमोर डोके टेकवणे या गोष्टींनाच जास्त प्राधान्य असते. वास्तविक आपल्याकडे असलेली प्राचीन मंदिरे ही त्या त्या काळात विशिष्ट हेतूने बांधली गेलेली आहेत. त्यांच्यावर कोरलेली विविध प्रतीके, मूर्ती त्या विशिष्ट काळावर प्रकाश टाकत असतात, त्या दृष्टीने मंदिर पाहायला हवे.

आपापल्या गावात किंवा परिसरात खूप सुंदर अगदी शिल्पसमृद्ध मंदिर असते. अनेकदा आपण तिथे जात असतो, पण तिथे काय पाहायचे आणि कशासाठी पाहायचं हे माहितीच नसते. वास्तविक मंदिरस्थापत्य आणि मूर्तिशास्त्र हे आपल्याकडे खूप प्रगत अवस्थेला पोहोचलं होतं. कुठलीही मूर्ती किंवा कोणतेही मंदिर बांधण्यामागे काही एक उद्देश असतो, एखादे तत्त्वज्ञान असते. ते समजून घेतले की, मंदिर पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या उत्साहाने पाहता येते. महाराष्ट्रात यादव आणि शिलाहार राजवटींच्या काळात मंदिरस्थापत्य भरभराटीला आलं होतं. शुष्क सांधी म्हणजे दोन दगडांमध्ये चुना, सिमेंटसारखे कोणतेही जोडणारे मिश्रण न वापरता निव्वळ दगडी बांधलेली मंदिरे. लोक  याला सरधोपटपणे हेमाडपंथी मंदिरे असा चुकीचा शब्द वापरून मोकळे होतो. यादव राजांचा प्रधान हेमाद्री याने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला. त्यात मंदिरबांधणीसंबंधीचे काही निर्देश केलेले आढळतात; पण या हेमाद्रीच्या आधीपासून आपल्याला ही शुष्कसांधी शैलीची मंदिरे आढळतात. त्यामुळे केवळ  हेमाद्रीच्या या ग्रंथातील या उल्लेखावरून या अशा मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे म्हणण्याची चुकीची पद्धत रुढ झाली. ती वास्तविक शुष्कसांधी शैलीची मंदिरे आहेत.

https://www.loksatta.com/lokprabha/vishesha/temple-tourism-1271160/