Sunday 14 March 2021

इब्राहिमखान गारदी (Ibrahim Khan Gardi)

गारदी, इब्राहिमखान : (? – १७६१). पानिपतच्या तिसऱ्या लढाईतील मराठ्यांचा एक प्रमुख सरदार. या लढाईत त्याने गारद्यांच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. तुकडीचे नेतृत्व असल्याने त्याने खान या नावाची पदवी धारण केली.

पाँडिचेरी येथे द ब्यूरी नावाचा एक कामगार होता. त्याच्या पालखीपुढे छडी घेऊन धावणारा एक लहानसा शिपाई म्हणून इब्राहिम खान काम करीत असे. त्यास थोडेफार पोर्तुगीज येत होते. लवकरच  त्याने आपल्या कार्यकर्तृत्वावर फ्रेंच फौजेत अंमलदारी मिळवली. पुढे फ्रेंचांची नोकरी सोडून तो निरनिराळ्या दरबारांत आपली कर्तबगारी दाखवू लागला. हैदराबादच्या निजामाच्या सेवेतही तो होता.

फ्रेंचांच्या पलटणीतील अधिकारी बुसी याने हिंदुस्थानात प्रथम गारद्यांची पलटण तयार केली. इब्राहिमखानानेही प्रशिक्षण घेतले होते. तो या बुसीचा चेला होता. मराठ्यांकडे मुज्जफरखान हा तोफखाना चालविणारा एक उत्तम गारदी होता. परंतु, तो जितका हुशार,कल्पक, तितकाच बेइमानी आणि खुनशी होता. त्याच्या ह्या वृत्तीमुळे सदाशिवराव भाऊ आणि त्याचे पटत नसे. इब्राहिमखान हा वऱ्हाडात निजाम अलीकडे काही दिवस होता. पेशवा आणि निजाम यांच्यात डिसेंबर १७५७ साली सिंदखेडला झालेल्या लढाईत इब्राहिमखान निजामाकडून लढला. मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. पुढे सलाबतजंगने बसालतजंगास आपला कारभारी म्हणून बदलून त्या जागी निजामअलीची नेमणूक केली. ही नेमणूक करताना निजाम अलीने इब्राहिमखानास नोकरीवरून काढावे, ही अट ठेवली. याचा फायदा घेऊन मराठ्यांनी इब्राहिमखानास नोकरीवर ठेवले. जून १७५८ नंतर हा मराठ्यांना येऊन मिळाला. उदगीरच्या लढाईत हा सदाशिवराव भाऊंच्या बरोबर होता. उदगीरनंतर सदाशिवराव भाऊंची पानिपतावर रवानगी झाली. तेव्हा इब्राहिमखान यांच्या इमानाविषयीचा उल्लेख भाऊसाहेबांच्या बखरीत सापडतो. एकनिष्ठतेची शपथ म्हणून सदाशिवराव भाऊंनी त्यास बेलभंडारा दिला, तर त्याने भाऊंना साजक रोटी (शपथेचा एक प्रकार) दिली. सदाशिवराव भाऊंच्याबरोबर दिल्लीस जाताना त्याच्या हाताखाली दहा हजार गारदी व शंभर तोफांचा तोफखाना होता.

click here more information


https://marathivishwakosh.org/36087/ 

No comments:

Post a Comment