Sunday 14 March 2021

पानिपतची तिसरी लढाई (Third Battle Of Panipat)

पार्श्वभूमी : अफगाणिस्तानच्या पातशाहाने संपूर्ण अफगाणिस्तान आपल्या आधिपत्याखाली आणल्यावर मुघल सत्तेवर स्वारी करण्याचे त्याने ठरविले आणि अफाट सैन्य घेऊन १७६० साली तो खैबर खिंडीतून पेशावरमार्गे पंजाब प्रांत पार करून दिल्लीवर चालून आला. मुघलांनी मराठ्यांची मदत मागितली आणि मराठ्यांनी मदतीसाठी आपले सैन्य सदाशिवरावभाऊंच्या आधिपत्याखाली दिल्लीला रवाना केले.

सदाशिवरावभाऊ १४ मार्च १७६० ला परतूडहून निघून पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा जंगी फौज मजलदरमजल करीत २ ऑगस्टला दिल्लीत पोहचली. आग्र्याला यमुना पार करून अहमदशहा अब्दालीशी अंतर्वेदीमध्ये (गंगा-यमुनामधील दुआबाचा प्रदेश) सामना करण्याचा भाऊंचा बेत दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमुळे तडीस जाऊ शकला नाही. मग सप्टेंबर १७६० अखेरीस मराठ्यांनी पानिपतमध्ये मोर्चाबंदी केली. १६ ऑक्टोबरला कुंजपुरा किल्ल्यावर धाड घालून अब्दालीची रसद त्यांनी लुटल्यावर तो बिथरला. २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान मराठ्यांच्या नकळत बांधपत येथे त्याच्या सैन्याने यमुना ओलांडली आणि मराठ्यांच्या दक्षिणेला त्याने मोर्चाबंदी केली. मग अब्दालीने पद्धतशीरपणे अगडबंब मराठा फौजेची रसद आटवली. यमुना पार करण्याची धूर्त चाल आणि रसद गोठवण्याचे डावपेच यांमुळे सदाशिवरावभाऊ कोंडीत सापडले आणि उपासमारीला कंटाळून १३ जानेवारी १७६१ रोजी त्यांनी ही कोंडी फोडण्यासाठी चढाई करण्याचे ठरवले. १४ जानेवारी २०१४ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस ठरला.

व्यूहरचना आणि रणनीती : दोन्ही बाजूंचे सेनाबळ बऱ्याच प्रमाणात समसमान होते. दोन्ही सेनांचे घोडदळ ४० हजारांच्या घरात होते. मराठ्यांच्या ३०–३५ हजार पायदळासमोर अफगाणी पायदळ ५०–५५ हजारांच्या घरात होते. मराठ्यांच्या २०० फ्रेंच बनावटीच्या तोफा, उंटावरील सुतरनाळा, जेजाला, जंबुरके या तोफा आणि इब्राहिमखान गार्दीसारखा अनुभवी तोपची यांमुळे त्यांचा तोफखाना संख्येत आणि आधुनिकतेत दुराण्यांपेक्षा उजवा होता. ती कमतरता भरून काढण्यासाठी अब्दालीने उंटावरील हलक्या आणि फिरत्या अशा एक हजार तोफा उभ्या केल्या होत्या. या तोफा त्यांच्या गतिमानशीलतेमुळे प्रभावी ठरल्या. अब्दालीच्या सैन्यात अफगाणिस्तानी आणि हिंदुस्तानी गिलचे समप्रमाणात होते.

पश्चिमेस पानिपत भोवतालचा खंदक आणि पूर्वेस यमुना यांच्या दरम्यान मराठा सैन्य पश्चिम-पूर्व सरळ रेषेत तैनात होते. पश्चिमेस होळकर व शिंद्यांच्या तुकड्या, मध्यभागी भाऊसाहेब आणि विश्वासराव यांची शाही हुजरात. त्यांच्यालगत विठ्ठल शिवदेव, दमाजी गायकवाड, विंचूरकर आणि अंताजी माणकेश्वर यांच्या तुकड्या आणि इब्राहिमखान गार्दी यांची तुकडी पूर्वेच्या कोपऱ्यात होती. भाऊंच्या मागे समशेर बहाद्दूर, यशवंतराव पवार, सटबोजी जाधव, नाना पुरंदरे यांचे दस्ते होते. दुर्दैवाने भाऊंनी राखीव अशी कोणतीही तुकडी पिछाडीस ठेवली नव्हती. ही एक चूक ठरली.

Click here more Information

https://marathivishwakosh.org/2828/ 

No comments:

Post a Comment