Thursday 11 March 2021

महायुद्ध, दुसरे : (१ सप्टेंबर १९३९ ते २ सप्टेंबर १९४५)

महायुद्ध, दुसरे : (१ सप्टेंबर १९३९ ते २ सप्टेंबर १९४५). या दुसऱ्या  जागतिक महायुद्धाचा पाया पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस घातला गेला. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी पहिले महायुद्ध आटोपले. १८ जानेवारी १९१९ रोजी पॅरिस येथे शांतता परिषद झाली. २८ जून १९१९ रोजी झालेला ⇨व्हर्सायचा तह याच्या कडक अटींचा तडाखा म्हणजे त्यांच्या पराजयाच्या खोल जखमेवर चोळलेले मीठ होते, या तहामुळे सगळ्या वसाहती गमवाव्या लागल्या. पहिल्या महायुद्धात काबीज केलेल्या ॲल्सेस-लॉरेन प्रांत परत द्यावा लागला. झार प्रांताला १९३९ सालापर्यंत आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. डॅन्झिग हे मुक्त शहर म्हणून जाहीर करण्यात आले. ऱ्हाईन खोऱ्यातील सुपीक व समृद्ध प्रदेश दोस्तांच्या काबूत गेला. हानीपूर्तीची रक्कम ६ अब्ज पौंड ठरविण्यात आली तिची फेड झाली नाही म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष प्वँकारेच्या अमदानीत ११ जानेवारी १९२३ रोजी कोळसा, लोखंड व उद्योग यांनी समृद्ध असलेला रूर प्रांत फ्रांन्स ताब्यात घेतला आपण हारलो हा जर्मन राष्ट्राला आश्चर्याचा व नामुष्कीचा धक्का होता. त्यामुळे १९२० साली स्थापन केलेल्या नाझी पक्षाचा पुढारी ⇨ॲडॉल्फ हिटलरने व्हर्साय तहाला गुलामगिरीचा तह म्हटले. या तहामुळे चिडलेल्या जर्मनांचा संताप पंधरा वर्षांच्या आत हिटलरने शिगेला पोहचविला.

click below link


https://vishwakosh.marathi.gov.in/28561/ 

No comments:

Post a Comment