Wednesday 25 August 2021

अतिवृष्टी, ढगफुटी व उपायांची पंचसूत्री

बुधवारी 21 जुलै आणि रात्री बारानंतर सुरू होणारा गुरुवारचा (22 जुलै) कमी वेळातील जास्त पाऊस अशी मोजदाद करता महाराष्ट्रात 30 पेक्षा जास्त ठिकाणी अवघ्या चोवीस तासांत अभूतपूर्व ढगफुटींचा वर्षाव झाला; पण भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) या सर्व ढगफुटी नाकारल्या आहेत. हा जीवघेणा पाऊस म्हणजे अतिवृष्टी किंवा महावृष्टी असल्याचे म्हटले आहे.

ढगफुटींमुळे शेती व शेती संलग्‍न इतर जोडधंदे, व्यवसाय-उद्योग यांना फार मोठा फटका बसला आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे तर एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेला ढगफुटींमुळे मोठा फटका बसणार आहे. म्हणून याकडे गांभीर्याने पाहण्याची, तसेच कृतीशील ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याची गरज आहे. येत्या काळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रत्येक व्यक्‍तीला या आपत्तीची किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे ‘पार्टी पॉलिटिक्स’मधून बाहेर पडून ‘नेशन फर्स्ट’ असे समजून सर्व घटकांनी कार्यरत होण्याची गरज आहे. कारण, कोरोनाच्या संकटासारखीच हीसुद्धा एक राष्ट्रीय आपत्तीच आहे.

Click more information

https://pudhari.news/sampadakiy/12275/%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%a2%e0%a4%97%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/ar 

No comments:

Post a Comment