Thursday, 9 September 2021

अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध

अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध: उत्तर अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्घ १७७५ पासून १७८३ पर्यंत केलेले यशस्वी बंड. त्याला ‘स्वातंत्र्ययुद्ध’ किंवा ‘अमेरिकन क्रांती’ म्हणतात.

 

सतरावे शतक व अठराव्या शतकाचा प्रथम चरण अशा दीर्घ कालावधीत अमेरिकेत अनेक यूरोपीय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. त्यांत इंग्‍लंडच्या तेरा वसाहती होत्या. या तेरा वसाहतींत स्थानिक वन्य जमाती, निग्रो गुलाम, इंग्रज, आयरिश, जर्मन, डच, स्पॅनिश, पोर्तुगीज आदी यूरोपीय असा संकीर्ण समाज नांदू लागला. यांत बहुसंख्य इंग्रज होते आणि त्यांच्या भाषेला सर्वमान्यता लाभली होती. बहुतेक वसाहतींचा कारभार ब्रिटिश शासनाने नियुक्त केलेला गव्हर्नर स्थानिक प्रातिनिधिक संस्थांच्या सल्ल्याने चालवीत असे.

 

तथापि फ्रेंच वसाहतींचा घेरा सभोवताली असल्याने ब्रिटिश वसाहतवाल्यांत सतत असुरक्षितपणाची भावना असे. स्वसंरक्षणासाठी मायदेशाच्या सैन्याची आवश्यकता असल्याने, मायदेशाने घातलेली अनेक राजकीय व आर्थिक बंधने त्यांना निमूटपणे मान्य करावी लागत. वसाहती म्हणजे स्वस्त व मुबलक कच्चा माल पुरविणारे, तसेच हव्या त्या चढ्या दराने पक्का माल घेणारे देश, असे इंग्‍लंडचे सर्वसाधारण धोरण असे. वसाहतींचा वाहतूक-व्यापार इंग्‍लंडच्याच बोटींतून (वसाहतींना स्वतंत्र बोटी नसल्याने) चालला पाहिजे, वसाहतींनी कच्चा माल इंग्‍लंडलाच विकला पाहिजे, इंग्‍लंडचाच पक्का माल विकत घेतला पाहिजे, स्वतः पक्का माल तयार करता कामा नये, कोणत्याही देशांतून माल आयात केल्यास तो प्रथम इंग्‍लंडमध्ये उतरवून मग वसाहतींत जावा इ. नौकानयन-कायद्यांतील निर्बंधांमुळे इंग्रज व्यापाऱ्‍यांचा अमाप फायदा, तर वसाहतवाल्यांची कुचंबणा होई. ह्यामुळे वसाहतींचा औद्योगिक विकास अर्थातच अशक्य झाला होता.


https://vishwakosh.marathi.gov.in/26832/ 

Wednesday, 8 September 2021

महाजनपद

महाजनपद : प्राचीन भारतातील जनसंपदा एक समूह. इ. स. पू. सहाव्या शतकाच्या आरंभी उत्तर भारतात अनेक लहान मोठी स्वतंत्र राज्ये अस्तित्वात होती. यांतील कालांतराने काही जनपदे मिळून महाजनपद निर्माण झाले. सोळा महाजनपदांची माहिती प्राचीन बौद्ध व जैन वाङ्मयातून मिळते. यांतील महत्त्वाच्या राज्यांच्या राजवंशावळी पुराणांत येतात मात्र त्यांमध्ये राजशासित जनपदांप्रमाणे गणशासित जनपदांचाही अंतर्भाव केला आहे. या सोळा महाजनपदांच्या याद्या एकरुप नाहीत तथापि बौद्ध पाली ग्रंथ अंगुत्तरनिकाय यातील पुढील जनपदांची यादी प्रातिनिधिक मानता येईल : अंग, मगध, काशी, कोसल, वृज्जि, मल्ल, वेदी, वत्स, कुरु, पंचाल,मत्स्य, शूरसेन, अश्मक, अंवती, गंधार आणि कंबोज. यांच्याविषयी याच क्रमाने संक्षिप्त माहिती खाली दिली आहे.

click लिंक  अधिक माहितीसाठी

https://vishwakosh.marathi.gov.in/28533/ 

वेदकाल

click लिंक 

https://vishwakosh.marathi.gov.in/32986/ 

सिंधु संस्कृति

सिंधु संस्कृति : भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. सिंधूसंस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी १९२१ मध्येउजेडात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खननझाले, त्यात सिंधू संस्कृतीचेताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले.राखालदास बॅनर्जी यांनी मोहें-जो-दडोचा शोध लावला (१९२२).यानंतर या दोन्ही स्थळी ⇨सर जॉन मार्शल, इ. जे. एच्. मॅके, ⇨ माधोस्वरुप वत्स, ⇨ सर मॉर्टिमर व्हीलर  इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली. याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात(विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे उजेडातआली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्यानेतिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले.

त्यानंतरच्या उत्खनन-संशोधनांत या संस्कृतीच्या व्याप्तीबद्दलच्याकल्पनांत आमूलाग्र बदल झालेले आहेत. प्रारंभी पंजाबात ⇨ रुपड  पासून ते पश्चिमेस बलुचिस्तानातील ⇨सुक्तगेनडोर  एवढ्या विभागातया संस्कृतीच्या अवशेषांची लहानमोठी सु. ६० व दक्षिणेस पश्चिमकिनाऱ्यालगत सौराष्ट्रात सु. ४० स्थळे ज्ञात झाली होती मात्र आजमितीला सिंधू संस्कृतीच्या दोन हजारांहून अधिक स्थळांचा शोध लागलाआहे. त्यांपैकी सु. १५०० भारतात आणि सु. ५०० पाकिस्तानात आहेत.विशेष म्हणजे त्यातील बहुसंख्य – सहाशेहून अधिक –हरयाणा –राजस्थानमधील सरस्वतीच्या (सांप्रत घग्गर) खोऱ्यात आहेत. गुजरातेत⇨ लोथल   व त्याच्या दक्षिणेस भगतराव येथेही सिंधू संस्कृतीचे लोकराहत असत, शिवाय राजस्थानात ⇨कालिबंगा, गिलुंड व इतर अनेकठिकाणी तसेच उत्तर प्रदेशात मीरतच्या पश्चिमेस सु. ३१ किमी.वर अलमगीरपूर येथे सिंधू संस्कृतीचे लोक राहत असत, असे आढळूनआले आहे. भगतराव मोहें-जो-दडोपासून आग्नेयीस सु. ८०५ किमी.वरआहे सुक्तगेनडोर कराचीपासून पश्चिमेस सु. ४८३ किमी.वर आहेआणि अलमगीरपूर मोहें-जो-दडोच्या पूर्वेस सु. ९६६ किमी.वर आहे.हरयाणा आणि पंजाबात बनवाली, मिताथल या स्थळांशिवाय सिंधमध्येयारी या ठिकाणी सिंधू संस्कृतिसदृश अवशेष मिळाले. यावरुन सिंधूसंस्कृतीची व्याप्ती किती विस्तृत होती, याची कल्पना येते.

click link more information

https://vishwakosh.marathi.gov.in/25776/