Wednesday, 19 November 2025

चरित्र

चरित्र : चरित्र ही एका व्यक्तीच्या संपूर्ण जीविताची वा त्यातील विशिष्ट कालखंडाची कहाणी असते. चरित्रलेखनात पहिली शर्त वस्तुनिष्ठेची. प्रत्यक्ष घडलेल्या घटना-प्रसंगांशी व प्रत्यंतर-पुराव्यांशी चरित्रकारास प्रामाणिक रहावे लागते. त्यामुळे चरित्र ही इतिहासाची शाखा मानली जाते. इतिहाससंशोधकाप्रमाणे येथेही चरित्रकारास गौणप्रधान सर्व प्रकारची साधने गोळा करावी लागतात व इतिहासकाराप्रमाणे त्यांतून नेमकी निवड आणि सुसंगत जुळणी करावी लागते. पण चरित्र म्हणजे इतिहास नव्हे. इतिहासात व्यक्ती हे साधन व कालपट हे साध्य असते, तर चरित्रात पार्श्वभूमीसारखा काळ हे साधन आणि व्यक्तिदर्शन हे साध्य असते. हे व्यक्तिदर्शन जिवंत होण्यासाठी चरित्रकारास एखाद्या कादंबरीकाराप्रमाणे अंतर्विश्वाचा ठाव घेणारी सहभावना व कल्पकता यांचीही गरज असते.

या साहित्यप्रकाराची प्रेरणा आदरणीय व्यक्तीची स्मृती जागवणे, त्याचप्रमाणे स्वतःच्या आदर्शाचे सातत्य टिकवणे अशा स्वरूपाची असते. त्यामागे आत्मीयतेची, कृतज्ञतेची व विभूतिपूजेची भावनाच बलवत्तर असते. धर्म, राजकारण, समाजकारण, साहित्य, कला, संशोधन इ. क्षेत्रांतील अलौकिक व्यक्तीच बहुधा चरित्रविषय बनतात. हळूहळू ही गोष्ट बदलत आहे. मानवी स्वभावाविषयीच्या निखळ कुतूहलातून सध्या चरित्रलेखन होऊ लागले आहे. त्यामुळे माहात्म्ये व स्तोत्रे यांच्या अंगाने जाणारे चरित्रलेखन मागे पडत आहे. मानवी स्वभाव व वर्तन यांविषयीची सुजाण वाचकाची जिज्ञासापूर्ती करणे, हे चरित्रवाङ्‌मयाचे उद्दिष्ट ठरू पाहत आहे. मात्र ही जिज्ञासा कथा- कादंबरीहून अर्थातच भिन्न असते. कथा-कादंबरीत कल्पित भावसत्याची, तर चरित्रात घटित भावसत्याची जिज्ञासा असते. सत्य जाणून घेण्याची कुतूहल हे येथे मूलभूतच असते 

click more information.

https://vishwakosh.marathi.gov.in/17981/

No comments:

Post a Comment