Thursday 28 October 2021

मराठी साहित्य (अर्वाचीन-३)

लघुनिबंध : लघुनिबंध मराठीमध्ये १९२७ च्या आसपास जन्माला आला.  तो जन्माला यायला १९२७ पूर्वीची मराठीची वाङमयीन पार्श्वभूमी जशी कारणीभूत आहे त्याचप्रमाणे त्याला नीटस आकार यावयाला इंग्रजीतील ‘पर्सनल एसे’ हाही कारणीभूत आहे.

मराठी साहित्यातील लघुनिबंधपूर्व तत्सदृश लेखनाकडे पाहात असताना असे दिसून येते, की शि.म. परांजपे यांचे काळातील काही लेख, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे विनोदी लेख, न. चिं. केळकर यांचे निबंध यांनी लघुनिबंधमाला अनुकूल वातावरण तयार केले. तसेच या काळात अनेक नियतकालिकांतून अनेक प्रकारचे ज्ञान, माहिती ही ललित पद्धतीने, ललित भाषेत लेख लिहून सांगितली जात होती.  जीवनातील सामान्य, क्षुद्र विषयांवर चुरचुरीत लेख लिहून वाचकांचे मनोरंजन केले जात होते.  अशा प्रकारच्या लेखनाला या काळात ‘पानपूरके’ म्हणूनच केवळ स्थान होते.  त्याला विशेष असे ‘प्रकारनाम’ नव्हते.  शिवाय या काळात काही इंग्रजी लघुनिबंधांची भाषांतरे होऊन तीही पानपूरकासारखी प्रसिद्ध झालेली आहेत.  अशा रीतीने या जवळच्या पूर्वकाळात लघुनिबंधाची जातकुळी सांगणारे स्फुटलेखन प्राकारिक नाव न घेता विपुल प्रमाणात जन्माला येत होते. CLICK LINK

https://vishwakosh.marathi.gov.in/40950/ 

No comments:

Post a Comment