Saturday, 1 July 2023
Friday, 30 June 2023
बुक ब्रो वंदना बोकील कुलकर्णी
बुक ब्रो चा हा 47 वा भाग म्हणजे प्रख्यात लेखिका समीक्षक, संपादक वंदना बोकील कुलकर्णी यांच्याशी रंगलेला दीर्घ स
रोहिणी भाटे यांच्या त्यांनी लिहिलेल्या चरित्रापासून ते संवाद सेतू या त्या संपादित करीत असलेल्या दिवाळी अंकापर्यंत अनेक विषय कवेत घेत झालेला हा संवाद अर्थपूर्ण आहे. लेखक, गायक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी वंदना बोकील कुलकर्णी यांना समीक्षा विचार आणि साहित्य व्यवहार आणि त्यातील राजकारण यावरही बोलते केले आहे. पण मुख्य आहे तो नितळ साहित्य प्रेमाचा वंदना-सूर आणि त्यांनी सादर केलेल्या अनेक साहित्यिक कार्यक्रमांची रोचक उजळणी.
Click link
Friday, 23 June 2023
Book bro episode 45
https://youtu.be/K1ON4hVjYUQ
*Book Bro Episode 45/ ब्रिटानिया ते एनर्जी एक्सचेंज व्हाया एनरॉन* /युक्तीच्या गोष्टी सांगणाऱ्याची गोष्ट/ जयंत देव / *शिल्पा शिवलकर*
प्रस्तुतकर्ता : *डॉ. आशुतोष जावडेकर*
मोठ्या औद्योगिक समूहांना व्यावसायिक सल्ला देणारे जयंत देव यांचा जीवन प्रवास वेगळा आहे. ब्रिटानियामधील बिस्किट , कोयना धरणाच्या बोगद्यामधील काम, एनरॉनचं बुडणं (आणि बुडवणं!) कोटा अणुऊर्जा प्रकल्प अशा नाना टप्प्यांवर वाचकाला नेणारं देव यांचं व्यावसायिक चरित्र पुस्तक म्हणजे युक्तीच्या गोष्टी सांगणाऱ्याची गोष्ट. *जयंत देव* यांनी इंडियन एनर्जी एक्सचेंजचे पहिले MD, CEO म्हणून केलेलं काम तर मुळातून वाचण्याजोगे. पण तोवर बुक ब्रो चा हा *45 वा भाग* या आगळ्या प्रवासावर आणि पुस्तकावर.
डॉ. आशुतोष जावडेकर यांची ही संपूर्ण मालिका बघण्यासाठी *Ashu's Tunes* हा युट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा.https://youtu.be/K1ON4hVjYUQ