Thursday, 28 October 2021

प्रवासवर्णन

प्रवासवर्णन : प्रवासात जे प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले ते लेखनरूपाने मांडणे म्हणजे प्रवासवर्णन, असे स्थूलमानाने म्हणता येईल. सामान्यतः वर्णनाची पातळी हकीकतीची किंवा वृत्तांतकथनाची राहते. देश, काल,परिस्थिती ह्यांचे वर्णन, प्रवासातील हालअपेष्टा, मौजमजा वगैरेंच्या हकीकती वस्तुनिष्ठपणे सांगणे, असेच त्यांचे परंपरगत स्वरूप असते. अशी प्रवासवर्णने त्या त्या काळच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारी म्हणून अभ्यासाची साधने होऊ शकतात. असे प्रवासवृत्तांत बरेच आढळतात. फाहियानचे (चौथे शतक) इंग्रजीत भाषांतरित झालेले प्रवासवर्णन अ रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्ट किंग्डम्सया नावाचे आहे. फाहियानप्रमाणेच भारताचा प्रवास करणारा दुसरा प्रसिद्ध चिनी प्रवासी म्हणजे ह्यूएनत्संग (सु. ६००–६६४) होय. त्याच्या प्रवासाचा वृत्तांत रेकॉर्ड्‌स ऑफ वेस्टर्न रिजन्स ऑफ द ग्रेट तेंग डिनॅस्टी ह्या पुस्तकात ग्रथित झाला आहे. भारतात आलेला व तत्संबधी प्रवासवर्णन लिहिणारा आणखी एक चिनी प्रवासी म्हणजे इत्सिंग (६३४–७१३) हा होय.

Click LINK FOR MORE INFORMATION


https://vishwakosh.marathi.gov.in/27337/ 

No comments:

Post a Comment