Thursday, 28 October 2021

मराठी साहित्य (अर्वाचीन-३)

लघुनिबंध : लघुनिबंध मराठीमध्ये १९२७ च्या आसपास जन्माला आला.  तो जन्माला यायला १९२७ पूर्वीची मराठीची वाङमयीन पार्श्वभूमी जशी कारणीभूत आहे त्याचप्रमाणे त्याला नीटस आकार यावयाला इंग्रजीतील ‘पर्सनल एसे’ हाही कारणीभूत आहे.

मराठी साहित्यातील लघुनिबंधपूर्व तत्सदृश लेखनाकडे पाहात असताना असे दिसून येते, की शि.म. परांजपे यांचे काळातील काही लेख, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे विनोदी लेख, न. चिं. केळकर यांचे निबंध यांनी लघुनिबंधमाला अनुकूल वातावरण तयार केले. तसेच या काळात अनेक नियतकालिकांतून अनेक प्रकारचे ज्ञान, माहिती ही ललित पद्धतीने, ललित भाषेत लेख लिहून सांगितली जात होती.  जीवनातील सामान्य, क्षुद्र विषयांवर चुरचुरीत लेख लिहून वाचकांचे मनोरंजन केले जात होते.  अशा प्रकारच्या लेखनाला या काळात ‘पानपूरके’ म्हणूनच केवळ स्थान होते.  त्याला विशेष असे ‘प्रकारनाम’ नव्हते.  शिवाय या काळात काही इंग्रजी लघुनिबंधांची भाषांतरे होऊन तीही पानपूरकासारखी प्रसिद्ध झालेली आहेत.  अशा रीतीने या जवळच्या पूर्वकाळात लघुनिबंधाची जातकुळी सांगणारे स्फुटलेखन प्राकारिक नाव न घेता विपुल प्रमाणात जन्माला येत होते. CLICK LINK

https://vishwakosh.marathi.gov.in/40950/ 

प्रवासवर्णन

प्रवासवर्णन : प्रवासात जे प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले ते लेखनरूपाने मांडणे म्हणजे प्रवासवर्णन, असे स्थूलमानाने म्हणता येईल. सामान्यतः वर्णनाची पातळी हकीकतीची किंवा वृत्तांतकथनाची राहते. देश, काल,परिस्थिती ह्यांचे वर्णन, प्रवासातील हालअपेष्टा, मौजमजा वगैरेंच्या हकीकती वस्तुनिष्ठपणे सांगणे, असेच त्यांचे परंपरगत स्वरूप असते. अशी प्रवासवर्णने त्या त्या काळच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारी म्हणून अभ्यासाची साधने होऊ शकतात. असे प्रवासवृत्तांत बरेच आढळतात. फाहियानचे (चौथे शतक) इंग्रजीत भाषांतरित झालेले प्रवासवर्णन अ रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्ट किंग्डम्सया नावाचे आहे. फाहियानप्रमाणेच भारताचा प्रवास करणारा दुसरा प्रसिद्ध चिनी प्रवासी म्हणजे ह्यूएनत्संग (सु. ६००–६६४) होय. त्याच्या प्रवासाचा वृत्तांत रेकॉर्ड्‌स ऑफ वेस्टर्न रिजन्स ऑफ द ग्रेट तेंग डिनॅस्टी ह्या पुस्तकात ग्रथित झाला आहे. भारतात आलेला व तत्संबधी प्रवासवर्णन लिहिणारा आणखी एक चिनी प्रवासी म्हणजे इत्सिंग (६३४–७१३) हा होय.

Click LINK FOR MORE INFORMATION


https://vishwakosh.marathi.gov.in/27337/ 

Wednesday, 20 October 2021

मानव भूगोल

मानव भूगोल :मानव आपल्या बुद्धिमत्तेने व कुशलतेने सभोवार नैसर्गिक व मानवकृत पर्यावरणाचा कसा उपयोग करून घेतो, याचा अभ्यास करणारे शास्त्र. गेल्या शतकातील ‘प्राकृतिक व मानव’ अशा भूगोलशास्त्राच्या विभाजनात या शास्त्राचा उगम दिसून येतो. त्या काळातील पाश्चात्त्य औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे ‘मानवाचा निसर्गावर विजय’ या विचाराने भूगोलवेत्त्यांचे व इतर तज्ञांचे मन भारले गेले. तत्कालीन व काही नंतर प्रसिद्ध झालेले ग्रंथ, तसेच शालेय, विद्यापीठीय पाठ्यपुस्तके यांमधून व अध्यापनातून हा विचार स्पष्ट उमटलेला दिसतो. अनेक अज्ञात प्रदेशांचे शोधन व ज्ञात प्रदेशांचा अभ्यास यांमुळे ‘मानवावर निसर्गाचा पूर्ण प्रभाव असतो’, ही विचारसरणी त्या काळातच मांडली गेली. पण हे दोन्ही विचार आता जवळजवळ नाहीसे होऊन ‘मानव – पर्यावरणसंबंधात मानव कितीही बुद्धिमान व चतुर असला, तरी तो जीवसृष्टीचा एक घटक असल्याने त्याने निसर्गाशी मिळते-जुळते घेतले पाहिजे’, ही जाणीव शास्त्रज्ञांमध्ये प्रकर्षाने येऊ लागली आहे, हे विद्यमान मानव भूगोलशास्त्रात दिसून येते.

उगम व वाढ : या शास्त्राचा पाया घालण्याचे श्रेय फ्रेंच भूगोलतज्ञ पॉल व्हीदाल द ला ब्लाश (१८४५–१९१८) यांना दिले पाहिजे. त्यांचा ‘मानव भूगोलशास्त्राची तत्त्वे’ (१९११ इंग्लिश अनुवाद) हा अद्यापिही एक आधारभूत ग्रंथ मानला जातो. पुढे झां ब्रुने (१८६९–१९३०), आल्बेअर दमॉन्‌झॉन (१८७२–१९४०), सॉर् अशा तज्ञांनी ‘व्हीदाल परंपरे’ त भर घातली.

https://vishwakosh.marathi.gov.in/28868/ 

वाङ्‌मयेतिहास

वाङ्‌मयेतिहास : एका विशिष्ट भाषेतील समग्र वाङ्‌मयकृतींचा आणि वाङ्‌मयीन घडामोडींचा एक विशिष्ट दृष्टिकोण घेऊन केलेला ऐतिहासिक अभ्यास म्हणजे वाङ्‌मयेतिहास. वाङ्‌मयेतिहास ही वाङ्‌मयाच्या अभ्यासाची एक पद्धती आहे आणि ती वाङ्‌मयसिद्धान्त आणि वाङ्‌मयीन टीका या वाङ्‌मयाभ्यासाच्या इतर दोन पद्धतींहून पूर्णपणे वेगळी आहे. वाङ्‌मयनिर्मितीच्या प्रेरणा-प्रवृत्तींची आणि प्रभाव-परिणामांची कालसंगत अशी जाणीव प्रस्थापित करणे, हे वाङ्‌मयेतिहासाचे कार्य असते. वाङ्‌मयनिर्मिती ही अखेरतः मानवी कृती आहे. त्यामुळे एखाद्या मानवसमूहाचा त्याच्या स्वतःच्या वाङ्‌मयाद्वारे झालेला विशिष्ट कालखंडातील आविष्कार टिपणे आणि स्पष्ट करणे असेही वाङ्‌मयेतिहासाचे कार्य सांगता येते. या अर्थाने वाङ्‌मयेतिहास हा त्या विशिष्ट समाजाच्या विशिष्ट कालखंडातील संवेदनशीलतेचा इतिहास असतो. वाङ्‌मयकृती आणि वाङ्‌मयीन वातावरण यांची मिळून जी वाङ्‌मयव्यवस्था निर्माण होते, तिचे विशिष्ट तिचे देशकालपरिस्थितिनुसार आकलन करून घेणे हे वाङ्‌मयेतिहासाचे ध्येय असते. मुद्रणपूर्व काळातील हस्तलिखिते आणि तदनंतरचे मुद्रित वाङ्‌मय ही वाङ्‌मयेतिहासलेखनाची मुख्य सामग्री होय. परंतु या वाङ्‌मयकृतींमागील वाङ्‌मयीन वातावरणाचाही परामर्श वाङ्‌मयेतिहासलेखकाला घ्यावा लागतो. लेखकांची वाङ्‌मयीन चरित्रे, प्रकाशनसंस्था, साहित्यविषयक कार्य करणाऱ्या संस्था, वाचकवर्ग आणि त्याची अभिरुची, वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथमाला इ. वाङ्‌मयप्रसाराची विविध माध्यमे, वाङ्‌मयाशी अनुबंध असणाऱ्या नाट्यादी ललित कला, वाङ्‌मयीन चळवळी, चर्चासत्रे, परिसंवाद आणि सभासंमेलने, विविध स्वरूपांचे वाङ्‌मयीन पुरस्कार, पारितोषिके, अनुदाने व शिष्यवृत्ती, शालेय व विद्यापीठीय पातळीवरील वाङ्‌मयाचे अध्ययन-अध्यापन अशा अनेकविध गोष्टी वाङ्‌मयीन वातावरण घडवीत असतात. त्यामुळे या सामग्रीचाही विचार वाङ्‌मयेतिहासलेखकाला करावा लागतो. वाङ्‌मयकृती व वाङ्‌मयीन वातावरण यांवर समाजातील सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, इ. घडामोडींचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम असतो. त्यामुळे त्यांचे यथोचित भान वाङ्‌मयेतिहासलेखकाला ठेवावे लागते. वाङ्‌मयेतिहास हा अशा रीतीने समाजाच्या वाङ्‌मयीन संचिताचाच ऐतिहासिक शोध घेण्याचा एक प्रयत्न असतो.

Click link for more information

https://vishwakosh.marathi.gov.in/32389/ 

साहित्यप्रकार

 साहित्यप्रकार म्हणजे साहित्याचे वर्गीकरण. लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते. वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची सुटी-सुटी वैशिष्ट्ये सांगणारे आणि यांपैकी प्रत्येक साहित्यप्रकाराची ऐतिहासिक उत्क्रांती कशी झाली, याची मांडणी करणारे अभ्यास महत्त्वाचे आहेतच परंतु साहित्यप्रकार म्हणजे काय ? या प्रश्नाची तात्त्विक वा सौंदर्यशास्त्रीय चर्चा केल्याशिवाय साहित्यप्रकारांच्या संकल्पनेला स्पष्टता लाभत नाही. 

Click link for more information 

https://vishwakosh.marathi.gov.in/25694/ 

साहित्य :

साहित्य : मानवी जीवनव्यवहारविषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाच्या भाषिक अभिव्यक्तीस स्थूल मानाने ‘साहित्य’ असे संबोधिले जाते. जीवनव्यवहाराचे भावनिक, आध्यात्मिक, बौद्घिक अशा विविध अंगांनी घडविलेले सर्जनशील, वैचारिक, कल्पनात्मक, वास्तव अशा भिन्न-भिन्न स्तरांवरचे सर्वांगीण, सम्यक दर्शन साहित्यातून वाचकांस प्रतीत होते. ‘लिटरेचर’या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये ‘साहित्य’ वा ‘वाङ्‌मय’ हे पर्याय सामान्यतः समानार्थी म्हणून वापरले जातात. ‘Littera’ या मूळ लॅटिन शब्दापासून ‘लिटरेचर’ हा शब्द निर्माण झाला. Littera ही संज्ञा प्राचीन असून तिचा अर्थ वर्णमालेतील अक्षर वा अक्षरे, असा होतो. लिटरेचर ह्या संज्ञेला काळाच्या ओघात अनेक लेखक, समीक्षक, वाङ्‌मयेतिहासकार आदींनी साहित्याचा सर्वसमावेशक वा विवक्षित मर्यादित अर्थ विचारात घेऊन नानाविध अर्थ व अर्थच्छटा यांची परिमाणे बहाल केली. त्यांतून या संज्ञेचा अर्थविस्तार होऊन ती बहुआयामी व व्यापक, विस्तृत बनली. जे जे लिहिले जाते ते ते, म्हणजे सर्व लिखित मजकूर म्हणजे साहित्य, ही एक टोकाची व्याख्या काही तज्ज्ञांनी केली. अर्थातच ही भूमिका क्वचितच व अपवादाने घेतली गेल्याचे दिसते. याउलट दुसरी टोकाची भूमिका म्हणजे ⇨ इलिअड, ⇨ ओडिसी, ⇨ हॅम्लेट अशा केवळ अभिजात विश्वसाहित्याचाच निर्देश ‘साहित्य’ या संज्ञेने केला जावा, ही भूमिकाही फारशी स्वीकारार्ह ठरली नाही. या दोन टोकांच्या मध्ये अनेक परस्परभिन्न, विविधांगी भूमिका व दृष्टिकोण घेतले गेल्याचेही दिसून येते. लिटरेचर ही संज्ञा सैलसर व व्यापक अर्थाने अनेक संदर्भांत वापरली जाते. मराठीतील साहित्य व वाङ्‌मय या संज्ञांबाबतही हेच म्हणता येईल. उदा., एखाद्या विशिष्ट भाषेत निर्माण झालेले, विशिष्ट देशाचे साहित्य (अमेरिकन साहित्य फ्रेंच साहित्य इ.) विशिष्ट कालखंडात निर्माण झालेले साहित्य (एकोणिसाव्या शतकातील वाङ्‌मय) विशिष्ट जमातीने, लोकसमूहाने निर्माण केलेले वा विशिष्ट प्रदेशातील साहित्य (अमेरिकन-इंडियन साहित्य, निग्रो साहित्य, दलित साहित्य, प्रादेशिक वाङ्‌मय इ.) विशिष्ट विषयाला वाहिलेले साहित्य (क्रीडा, बागकाम आदी विषयांवरील लिखाण) इत्यादी. साहित्य व वाङ्‌मय ह्या संज्ञा सामान्यतः जरी समानार्थी वापरल्या जात असल्या, तरी त्यांच्या अर्थात व उपयोजनात भेद करावा, असे काही समीक्षकांनी सुचविले आहे. वाङ्‌मय हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापरावा, असे रा. श्री. जोग यांनी सुचविले आहे. डॉ. अशोक रा. केळकरांच्या मते ललित वाङ्‌मयालाच ‘साहित्य’ म्हणावे. साहित्य ही संज्ञा अर्थदृष्ट्या सारस्वत, विदग्ध वाङ्‌मय या संज्ञांच्या जवळ जाणारी आहे.

Click link fore more information

https://vishwakosh.marathi.gov.in/25690/ 

Tuesday, 12 October 2021

मृदा:

मृदा: मृदा म्हणजे शेतजमीन किंवा शेतमाती. ही एक स्वतंत्र सचेतन वस्तू आहे. ती नुसतीच झिजलेल्या खडकाचा चुरा नसून सचेतन आणि क्रियाशील आहे त्यामुळेच तीवर वनस्पती तग धरू शकतात. मृदा शब्दाची व्याख्या निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या रीतींनी केली आहे. सारांशाने ज्यावर वनस्पतीस आधार मिळतो, त्यांचे पोषण होते व त्या वाढू शकतात असा भूकवचाचा झिजलेला (रूपांतरित) थर म्हणजे मृदा असे म्हणता येईल. थोडक्यात मृदेवरच सकल प्राणिमात्रांचे जीवन, पालन, पोषण व पुनरूज्जीवन अवलंबून असते म्हणून मातीबद्दलचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. किंबहुना शास्त्रीय शेतीचा मृदा हा पायाच म्हणावा लागेल. जमिनीतून चांगले पीक काढता आले नाही, तर आपणास तिच्या समस्या समजल्याच नाहीत असे म्हणावे लागेल. कारण पिकासाठी योग्य जमिनीची निवड झाल्यास, तसेच जमिनीतील उणिवा योग्य प्रकारे भरून काढल्यास भरघोस पिके हमखास काढता येतात.

सर्वसामान्य माणूस मातीस अचेतन व निरुपयोगी पदार्थ म्हणून मानतो पण या मातीत वनस्पतींना पोषक अशी अन्नद्रव्ये असतात आणि म्हणूनच एक किग्रॅ. मक्याचे बी पेरले, तर त्यापासून २,००० ते ३,००० किग्रॅ. मका मिळू शकतो. येथे मृदा शब्द हा शेतजमीन ह्या अर्थी वापरला असून त्या दृष्टीनेच तिची उत्पत्ती, भौतिक व रासायनिक गुणधर्म, सर्वेक्षण व वर्गीकरण वगैरे बाबींचे विवरण केलेले आहे.

मृदा उत्पत्ती मूळ खडकावर ऊन, वारा, पाऊस इत्यादींमुळे होणाऱ्या अखंड वातावरणक्रियेने (आघाताने व प्रत्याघाताने रूपांतर होऊन) त्याची माती बनते. सर्वप्रथम खडक तुटून फुटून त्याचे लहान लहान तुकडे बनतात व यास भौतिक झीज क्रिया म्हणतात. त्यानंतर ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन], विद्रावीकरण (विरघळण्याची क्रिया), जलसंयोगीकरण, कार्बनीकरण इ. विघटन क्रियांमुळे त्यातील खनिज पदार्थांचे अपघटन (रेणूचे तुकडे होऊन घटक द्रव्ये अलग होण्याची क्रिया) व परिवर्तन होते. अशा प्रकारच्या भौतिक आणि रासायनिक झीज क्रिया अखंडपणे चालू असतात व त्याचबरोबर जैव घटकांचे कार्यदेखील चालू असते. त्यामध्ये सूक्ष्मजीव, त्यापेक्षा मोठे सजीव, पालापाचोळा, वनस्पतींची मुळे ही विघटनाच्या कार्यात मदत करतात आणि मातीत कार्बनी घटकाची वाढ होते. अशा रीतीने जमिनीचा पृष्ठभाग बनण्यास सुरुवात होते व हलके हलके ही झीज क्रिया पृष्ठभागाखाली सरकत जाते व परिणामी मातीस एक सलग स्वरूप प्राप्त होते आणि निरनिराळ्या थरांची उत्पत्ती होते. जमिनीची खोली काही सेंटिमीटरांपासून ते अनेक मीटरांपर्यंत असू शकते आणि ही खोली जमीन कोणत्या परिस्थितीत बनली त्यावर अवलंबून असते. अशा रीतीने अचेतन खडकापासून सचेतन अथवा क्रियाशील असा मातीची पिंड तयार होतो व त्यास एक विशेष प्रकारची संरचना व आकार असतो (आ. १). एच्. एच्. बेनेट या शास्त्रज्ञांच्या मते पृष्ठभागावरील मातीचा ३० सेंमी. थर तयार होण्यास सु. ६,००० वर्षांचा कालावधी लागतो.

Click link more information

https://vishwakosh.marathi.gov.in/30374/ 

Friday, 8 October 2021

यूपीएससीची तयारी : सद्गुणांवर आधारित नैतिक मांडणी

नीतिशास्त्राच्या अभ्यासामध्ये कायमच पुढील तीन सिद्धांतांचा प्रामुख्याने विचार केला जातो.

१) उपयुक्ततावादी मांडणी (जेरेमी बेंथम, जे.एस. मिल)

(२) कर्तव्यवादी विचारसरणी (इमॅन्युएल कान्ट, रॉल्सची न्यायाची मांडणी)

(३) सद्गुणांवर आधारित विचारसरणी (प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल)

Click Link  More information

https://www.loksatta.com/career-vrutantta/upsc-exam-2021-tips-on-upsc-ias-exam-preparation-strategy-zws-70-2616156/ 

यूपीएससीची तयारी : नैतिक विचारसरणींची परीक्षेच्या दृष्टीने प्रस्तुतता

मागील काही लेखांमध्ये आपण विविध नैतिक विचारसरणींचा अभ्यास केला. यूपीएससीच्या सामान्य अध्ययनाच्या चौथ्या पेपरमधील, विभाग ‘अ’ मध्ये या विचारसरणींवर आधारित अनेकदा थेट प्रश्न विचारले जातात. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारे विचारलेले प्रश्न व त्यांची नैतिक विचारसरणींनुसार विभागणी देत आहे. याचा उमेदवारांना निश्चित फायदा होईल. 

https://www.loksatta.com/career-vrutantta/upsc-exam-preparation-tips-upsc-exam-preparation-strategy-zws-70-2619385/