ऐतिहासिक घटनांमधील साक्षीदारांकडून त्यांच्या स्मृतींवर आधारित माहिती गोळा करणे व त्यांचे विश्लेषण करणे म्हणजे मौखिक इतिहास होय. ही क्रिया एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिकपद्धतीने जात असते. असंरचित मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीकडून एखाद्या घटनेची, कार्यक्रमाची किंवा क्रियेची माहिती गोळा करण्याची ही पद्धती होय. मौखिक इतिहास हा व्यक्तिच्या आठवणींवरती आधारित असतो. भूतकाळात घडलेल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या घटना व्यक्ती तिच्या आठवणींच्या आधारे एखाद्यास सांगतो व ऐकणारा त्या आठवणींच्या आधारावरून विश्लेषण करीत असतो.
मौखिक इतिहासपद्धती ही ऐतिहासिक दस्तऐवजीकरणासाठी वापरात येणारी सर्वात जुनी पद्धती मानली जाते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात युरोपियन समाजात प्रामुख्याने अशिक्षित–सर्वसामान्य समाजावरील संशोधनात मौखिक इतिहासपद्धतीचा वापर केला गेला. मौखिक इतिहासपद्धतीचा वापर ब्रिटनमधील कामगारांची परिस्थिती समजून घेण्यासाठी देखील केला गेला. तसेच पहिल्या व दुसऱ्या जागतिक युद्धांतील साक्षीदारांकडून युद्धाच्या आठवणी जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या पद्धतीचा वापर करण्यात आला.
Click here more information
No comments:
Post a Comment