Sunday 14 March 2021

ओपेक (Opec)

पार्श्वभूमी : खनिज तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणारी ही एक बहुराष्ट्रीय संघटना आहे . तेरा सभासद देश असलेल्या  ‘ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज’ (Opec) या संस्थेची  स्थापना सप्टेंबर १९६० मध्ये बगदाद येथे झाली व जानेवारी १९६१ मध्ये इराक, इराण ,सौदी अरेबिया, कुवेत आणि व्हेनेझुएला या  पाच देशांनी या संस्थेची औपचारिक संरचना केली. त्यानंतर तीत कतार (१९६१), इंडोनेशिया व लिबिया (१९६२), संयुक्त अरब अमिराती (१९६७), अल्जीरिया (१९६९), नायजेरिया (१९७१), एक्वादोर (१९७३), गॉबाँ (१९७५), आणि अंगोला (२००७) या देशांची भर पडली. ओपेकअंतर्गत देश जगातील ४२ टक्के तेल उत्पादन करतात आणि ७३ टक्के साठ्यात भागीदार आहेत. त्यामुळे तेलाच्या जागतिक किमतींवर त्यांचे नियंत्रण असते. त्याआधी अमेरिकेचे वर्चस्व असणाऱ्या सात आंतरराष्ट्रीय कंपन्या (सेव्हन सिस्टर्स) ही किंमत ठरवित असत. ओपेकच्या उत्पादन आणि साठ्याचा दोन तृतीयांश भाग इराणच्या आखातातील सहा मध्य-पूर्व देशांपाशी आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये अल्जीरिया, एक्वादोर, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती व व्हेनेझुएला हे देश ओपेकचे सभासद होते.

press below link for more information

https://marathivishwakosh.org/14861/ 

No comments:

Post a Comment