Sunday, 14 March 2021

साम्राज्यवाद

साम्राज्यवाद : ही एक राजनीती (धोरण) किंवा कृती वा तंत्र असून त्यानुसार एक देश वा लोकसमूह दुसऱ्या देशावर वा भूप्रदेशावर आधिपत्य प्रस्थापित करतो. एखाद्या समर्थ देशाने किंवा समूहाने लष्करी वा आर्थिक सामर्थ्याच्या बळावर दुसऱ्या देशाच्या भूप्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेस सर्वसाधारणतः ही संज्ञा देण्यात येते. आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमांपलीकडे अन्य भूप्रदेशावर आधिपत्य वा नियंत्रण प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्यशाही, असे स्थूलमानाने म्हणता येईल. ती कोणत्याही प्रदेशाच्या-देशाच्या शासनसत्तेने मग ती सत्ता लोकशाही, हुकूमशाही, राजेशाही वा अभिजनवर्गवादी स्वरुपाची असली, तरी तिचा उद्देश साम्राज्यविस्तार व वसाहत स्थापून त्या भूप्रदेशाचे आर्थिक शोषण करण्याचा तसेच राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे हा असतो. त्यास वसाहतवाद असे म्हणतात. वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक विशेष आविष्कार होय. औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवादाचे स्वरुप सर्वंकष होऊन त्याची परिणती नवसाम्राज्यवादात झाली.

साम्रा ज्यवाद वा साम्राज्यशाही या शब्दाची व्युत्पत्ती इंग्र जी शब्दकोशांत पुढीलप्रमाणे दिली आहे. मूळ लॅटिन इम्पेरेटर (Imperator) व त्यापासून बनलेला लॅटिन इम्पेरियम यांचा इंग्र जी प्रतिशब्द म्हणजे इम्पीरिअलिझम (साम्राज्यवाद) हा होय. वरील लॅटिन शब्दांचा अनुक्रमे शब्दार्थ सेनाधिपती व अधिक्षेत्र (राज्य) असा आहे. प्राचीन रोमन प्रजासत्ताकाच्या काळात लढाईत विजयश्री खेचून आणणाऱ्या सेनापतीस इम्पेरेटर हा सन्मानदर्शक किताब देण्यात येई. पुढे तोच किताब सीझर, ऑगस्टस आदींच्या रूपांत सर्वसत्ताधीश या अर्थाचा झाला. त्यामुळे अभिजात लॅटिनोत्तर काळात या रोमानिक संज्ञेचा वापर सार्वभौम राजा, या अर्थी करण्यात येऊ लागला आणि त्याच्या आधिपत्याखालील क्षेत्रास साम्राज्य म्हटले जाऊ लागले. साम्राज्यविस्तारासाठी जे धोरण वा कृती सार्वभौम शासनसंस्था आचरणात आणी, त्यास स्थूलमानाने साम्राज्यवाद ही संज्ञा रू ढ झाली.

ऐतिहासिक पार्श्वभूमी : साम्राज्यवादाला प्राचीन इतिहास आहे. प्राचीन काळी इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकापासून इ. स. सहाव्या-सातव्या शतकांपर्यंतच्या काळात ईजिप्त, बॅबिलोनिया, ॲसिरिया, भारत, इराण, ग्रीस, रोम (इटली) आदी प्रदेशांत कमी-अधिक प्रमाणात वैभवशाली संस्कृत्या नांदत होत्या. त्यांपैकी ईजिप्शियन, ॲसिरियन व बॅबिलोनियन राजांनी साम्राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर खाल्डियन संस्कृतीच्या काळात नेबोपोलॅसर (इ. स. पू. ६१५–६०५) या राजाने असूर व निनेव्ह ही नगरे जिंकून ॲसिरियन सत्ता नष्ट केली आणि नव-बॅबिलोनियन साम्राज्य स्थापन केले. त्यानंतर गादीवर आलेल्या दुसऱ्या नेबुकॅड्नेझर (कार. इ. स. पू. ६०५–५६२) या खाल्डियन सम्राटाने सिरिया व पॅलेस्टाइनची किनारपट्टी पादाक्रांत करून मेंफिस नगर घेतले. त्याच्या खाल्डियन सम्राज्याच्या वर्चस्वाखाली त्याच्या मृत्यूसमयी सबंध बॅबिलोनिया, दक्षिण ॲसिरिया, सिरिया व पॅलेस्टाइन या प्रदेशांचा अंतर्भाव होता. प्राचीन इराणमधील ⇨सायरस द ग्रे (कार. इ. स. पू. ५५०–५२९) हा इतिहासकाळातील थोर सम्राट होय. त्याचे इराणी साम्राज्य विस्तृत प्रदेशावर होते. गीसचा काही भाग, भूमध्य समुद्रातील काही बेटे आणि काबूल व सिंधू यांच्या पलीकडेही त्याने मोहिमा केल्या होत्या. सायरसनंतर मॅसिडोनियाचा जगप्रसिद्घ सम्राट ⇨ अलेक्झांडर द ग्रेट (इ. स. पू. ३५६–३२३) याने ग्रीसपासून भारतातील पंजाबपर्यंत विस्तीर्ण मुलूख जिंकून घेतला. त्याला या अवाढव्य सम्राज्याची प्रशासनव्यवस्था मार्गी लावण्यास अवधी मिळाला नाही तथापि सर्व ज्ञात जगाचे ग्रीसच्या सांस्कृतिक आधिपत्याखाली एक राष्ट्र बनवावे, ही त्याची महत्त्वाकांक्षा होती. त्याचे साम्राज्य हा प्राचीन गीसच्या वैभवशाली इतिहासाचाच एक भाग मानला जातो.

ग्रीकांप्रमाणे रोमनांनीही साम्राज्यशाहीचे प्रयोग केले. प्रजासत्ताक रोमचे आधिपत्य इटलीवर प्रथम स्थापन झाले आणि पुढे त्याचे सम्राज्यात रूपांतर होऊन यूरोप, आफ्रिका आणि आशिया खंडांतील अनेक देशांवर वर्चस्व प्रस्थापित झाले. वासाहतिक सम्राज्याची स्थापना आणि वृद्घी प्रजासत्ताकाच्या नेतृत्वाखालीच झाली. इ. स. पू. ६० ते ४९ दरम्यान पॉम्पी, ज्यूलिअस सीझर आणि क्रॅसस यांनी पहिले त्रिकूट (ट्रायमव्हरेट) बनवून संयुक्त रीत्या राज्यकारभार केला. पुढे सीझर कौन्सल झाला (इ. स. पू. ५९), त्याने अनेक नेत्रदीपक विजय मिळवून यूरोपात साम्राज्य सुस्थिर केले. ऑगस्टसपासून एकतंत्र अशी सम्राटांची सत्ता सुरू झाली. ऑगस्टसने रोमन राज्यकारभाराला जे बादशाही स्वरूप आणले होते, त्यानुसार पुढील सु. दोनशे वर्षे रोमन सम्राज्याला सुखशांतीची व समृद्घीची गेली. पुढे रोम ही राजधानी असलेले पश्चिम रोमन साम्राज्य हे रानटी टोळ्यांच्या कचाट्यात सापडले (इ. स. ४१०) आणि अखेर ते इ. स. ४७६ मध्ये पूर्णतः नष्ट झाले मात्र कॉन्स्टँटिनोपल हे राजधानी असलेले पूर्व रोमन साम्राज्य तुर्कांनी जिंकून घेईपर्यंत (१४५१) टिकून राहिले.

click below link and get more information

https://vishwakosh.marathi.gov.in/25589/ 

No comments:

Post a Comment