Monday, 22 March 2021

शिवराम हरी राजगुरू

शिवराम हरी राजगुरू (जन्म : खेड-पुणॆ, २४ ऑगस्ट १९०८; मृत्यू : लाहोर२३ मार्च १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवा दलामध्ये असतानाच त्यांचा संबंध हा हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी या क्रांतिकारी संघटनेशी आला. चंद्रशेखर आझादभगत सिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. लाला लजपत राय यांच्यावर साँडर्स नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी लाठीहल्ला केला, त्यात जखमी होऊन ते मरण पावले. त्याचा बदला घेण्यासाठी १७ फेब्रुवारी १९२८ रोजी राजगुरू, भगतसिंग यांनी लाहोर येथे साँडर्सवर गोळ्या घालून त्यांना ठार केले.

नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यांतही राजगुरूंचा सहभाग होता, २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग व सुखदेव, राजगुरु यांना फाशी देण्यात आली.

Click here more information

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82 

No comments:

Post a Comment