सामान्य अध्ययन पेपर-२ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासघटकांतर्गत भारत व शेजारील राष्ट्रे यामधील संबंधाचा आढावा घेऊन भारत आणि शेजारील देशातील द्विपक्षीय संबंधांचे चालू घडामोडींच्या अनुषंगाने कसे अध्ययन करावे, तसेच या घटकाच्या तयारीकरिता कोणते संदर्भसाहित्य वापरावे, याबाबत चर्चा करूया. प्रत्येक देश आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य देत असतो. कारण शेजारील राष्ट्रांशी असणारे संबंध देशाच्या सामरिक सुरक्षेला प्रभावित करत असतात. २०१५ साली भारताचे शेजारील देशांशी असणाऱ्या संबंधावर ‘मौसम‘ प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रश्न विचारला होता.
भारताच्या शेजारील देशांमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांग्लादेश, म्यानमार, श्रीलंका व मालदीव यांचा समावेश होतो. भारताचे या देशांशी असणारे संबंध ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून म्हणजेच स्वातंत्र्यापासून कसे उत्क्रांत होत गेले हे जाणून घ्यावे लागेल. तसेच समकालीन परिप्रेक्ष्यामध्ये विचार करता आर्थिक व व्यूहात्मक बाबींच्या पार्श्वभूमीवर अभ्यासावे लागतील. भारतासमोरील क्षेत्रीय आव्हानांचा विचार करून नरेंद्र मोदी सरकारने शेजारील देशांना समान वागणूक देण्याचे धोरण अवलंबले आहे. परराष्ट्र मंत्र्यांची भूतान भेट आणि मोदींच्या मे २०१९ मधील शपथ विधीकरिता ‘बिमस्टेक’ राष्ट्रांच्या प्रतिनिधींना दिलेल्या निमंत्रणावरून भारताचा कल ‘नेबरहूड फस्र्ट’ कडे असल्याचे अधोरेखित होतो. तरीही भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या
संबंधांच्या संदर्भामध्ये आधीच्या यूपीएप्रणीत सरकारच्या धोरणांचे सातत्य दिसून येते. भारताचे शेजारील देशांशी संबंध सुरुवातीपासूनच समानता व परस्परांचा आदर या मूलभूत तत्त्वावर आधारित आहेत. सर्वप्रथम आपण भारत व शेजारील देशांच्या संबंधाचा समकालीन परिप्रेक्ष्यामध्ये आढावा घेऊयात.
click link
https://www.loksatta.com/career-vrutantta-news/upsc-exam-study-upsc-student-exam-akp-94-2527084/
No comments:
Post a Comment