Monday, 5 July 2021

भारताचे परराष्ट्र धोरण

प्रस्तुत लेखामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेणार आहोत. यामध्ये प्रथम परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे पाहू. देशाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे महत्त्वाचे आहे, असे संबंध विशिष्ट तत्त्वे आणि धोरणांवर आधारित असतात. अशा तत्त्वे आणि धोरणांना परराष्ट्र धोरण म्हणता येईल. परराष्ट्र धोरणाची तत्त्वप्रणाली साधी आणि संक्षिप्त असू शकते किंवा गुंतागुंतीची आणि संदिग्धपण असू शकते. परराष्ट्र धोरणात निश्चितपणे राष्ट्र- राज्याची राजकीय उद्दिष्टे, नैतिक तत्त्वे आणि राष्ट्रहिताची परिभाषा यांचा समावेश होतो. परराष्ट्र धोरण पोकळीत अस्तित्वात येऊ शकत नाही. राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भामध्ये परराष्ट्र धोरण तयार होत असते. राष्ट्र-राज्याच्या निर्मितीशी संबंधित ऐतिहासिक घडामोडी, राष्ट्र निर्मितीची वैचारिक तत्त्व चौकट आणि राष्ट्र-राज्याच्या अस्तित्वाचे तार्किक अधिष्ठान यांच्या संगमातून राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा उगम होतो

Click link more information 

https://www.loksatta.com/career-vrutantta-news/upsc-exam-upsc-student-upsc-study-akp-94-2519989/ 

No comments:

Post a Comment