गुप्तकाल : तिसऱ्या शतकाच्या अखेरीस उत्तर हिंदुस्थानात, प्राचीन मगध देशात एक वंश उदयास आला. या वंशातील गुप्त नावाच्या पहिल्या राजावरून त्यास गुप्त वंश हे नाव मिळाले. या वंशातील राजांनी सु. ३०० ते ५५० पर्यंत भारतावर, विशेषतः उत्तर भारतावर, राज्य केले. या कारकीर्दीस गुप्तकाळ ही सर्वसाधारण संज्ञा देतात. या काळात गुप्तांच्या अंमलाखाली भारताचा सर्व उत्तर प्रदेश होता आणि त्यांचे मांडलिकत्व उत्तर हिंदुस्थानातील बहुतेक लहानमोठ्या राजांनी, तसेच पूर्वेकडील काही परकीय देशांनी मान्य केले होते. दक्षिणेतील बहुतेक राज्ये त्यांच्या वर्चस्वाखाली होती. यामुळे या काळात अखिल हिंदुस्थानवर गुप्तांचा अंमल होता, असे म्हणावयास हरकत नाही. या काळात राजकीय स्थैर्यामुळे कला, वाङ्मय वगैरे सर्व बाबतींत सर्वांगीण प्रगती झाली.
No comments:
Post a Comment