Monday, 17 August 2020

भोसले घराणे


भोसले घराणे: सतराव्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थो👉र मराठा घराणे. भोसले कुळाच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून (१६७४) भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे (राजपूत) कुळाशी संबंध जोडण्यात आला. मराठी बखरींनी पुढे तोच क्रम चालू ठेविला. मुसलमानांचे उत्तर हिंदुस्थानात वर्चस्व वाढले, तेव्हा भोसले दक्षिणेत आले, असे बखरींचेच प्रतिपादन आहे. शिसोदे–भोसले संबंध दाखविणारा स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा नाही. या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष बाबाजी भोसले. त्याचे दोन पुत्र मालोजी (मृ, १६०७) आणि विठोजी हे वेरुळ-घृष्णेश्वर भागात निजामशाहीच्या  आश्रयाने प्रथम उदयास आले. पुणे जिल्ह्यातील पुणे व सुपे या जहागिरी मालोजीकडे होत्या. मालोजीस दोन पुत्र होते : ⇨ शहाजी (१६०२–६४) आणि शरीफजी (ॽ -१६२४). त्यांपैकी शहाजी हा प्रथम निजामशाहीत आणि नंतर आदिलशाहीत पराक्रम करून नावलौकिकास चढला. आदिलशाहने त्याची नेमणूक कर्नाटकात केली. त्याने बंगलोरला मोठी जहागीर संपादन केली. त्याचे उर्वरित आयुष्य कर्नाटकात आदिलशाहीच्या सेवेत, पण मोठ्या वैभवात गेले. राधामाधवविलासचंपू या समकालीन काव्यग्रंथावरून शहाजीच्या योग्यतेची कल्पना येते.

        click link⇓            https://vishwakosh.marathi.gov.in/28254/ 

No comments:

Post a Comment