सिंधु संस्कृति : भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. सिंधूसंस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी १९२१ मध्येउजेडात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खननझाले, त्यात सिंधू संस्कृतीचेताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले.राखालदास बॅनर्जी यांनी मोहें-जो-दडोचा शोध लावला (१९२२).यानंतर या दोन्ही स्थळी ⇨सर जॉन मार्शल, इ. जे. एच्. मॅके, ⇨ माधोस्वरुप वत्स, ⇨ सर मॉर्टिमर व्हीलर इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली. याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात(विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे उजेडातआली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्यानेतिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले.
त्यानंतरच्या उत्खनन-संशोधनांत या संस्कृतीच्या व्याप्तीबद्दलच्याकल्पनांत आमूलाग्र बदल झालेले आहेत. प्रारंभी पंजाबात ⇨ रुपड पासून ते पश्चिमेस बलुचिस्तानातील ⇨सुक्तगेनडोर एवढ्या विभागातया संस्कृतीच्या अवशेषांची लहानमोठी सु. ६० व दक्षिणेस पश्चिमकिनाऱ्यालगत सौराष्ट्रात सु. ४० स्थळे ज्ञात झाली होती मात्र आजमितीला सिंधू संस्कृतीच्या दोन हजारांहून अधिक स्थळांचा शोध लागलाआहे. त्यांपैकी सु. १५०० भारतात आणि सु. ५०० पाकिस्तानात आहेत.विशेष म्हणजे त्यातील बहुसंख्य – सहाशेहून अधिक –हरयाणा –राजस्थानमधील सरस्वतीच्या (सांप्रत घग्गर) खोऱ्यात आहेत. गुजरातेत⇨ लोथल व त्याच्या दक्षिणेस भगतराव येथेही सिंधू संस्कृतीचे लोकराहत असत, शिवाय राजस्थानात ⇨कालिबंगा, गिलुंड व इतर अनेकठिकाणी तसेच उत्तर प्रदेशात मीरतच्या पश्चिमेस सु. ३१ किमी.वर अलमगीरपूर येथे सिंधू संस्कृतीचे लोक राहत असत, असे आढळूनआले आहे. भगतराव मोहें-जो-दडोपासून आग्नेयीस सु. ८०५ किमी.वरआहे सुक्तगेनडोर कराचीपासून पश्चिमेस सु. ४८३ किमी.वर आहेआणि अलमगीरपूर मोहें-जो-दडोच्या पूर्वेस सु. ९६६ किमी.वर आहे.हरयाणा आणि पंजाबात बनवाली, मिताथल या स्थळांशिवाय सिंधमध्येयारी या ठिकाणी सिंधू संस्कृतिसदृश अवशेष मिळाले. यावरुन सिंधूसंस्कृतीची व्याप्ती किती विस्तृत होती, याची कल्पना येते.
click link more information
No comments:
Post a Comment