Sunday, 19 September 2021

फ्रेंच राज्यक्रांति

फ्रेंच राज्यक्रांति  :  इ . स . १७८९  मध्ये फ्रान्स मध्ये झालेली ही राज्यक्रांती म्हणजे अठरा व्या शतकातील जगाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वा ची घटना होय .  या क्रांतीमुळे निर्माण झालेल्या विचारप्रवाहांचा युरोपीय देशांवर निरनिराळ्या प्रमाणात प्रभाव पडून युरापची सरंजामशाही समाजरचना पूर्ण नष्ट झाली आणि भांडवलशाही समाजरचना औद्योगिक क्रांतीच्या पायावर उभारली जाऊ लागली  म्हणून आधु निक यूरोपची उभारणी फ्रेंच राज्यक्रांतीपासून झाली असे मानतात .  त्याचप्रमाणे क्रांती ही संकल्पना इतिहास व राज्यशास्त्र यांत प्रथम अस्तित्वात आली ,  ती फ्रेंच राज्यक्रांतीनंतर व राज्यक्रांतीमुळेच!  १७८९  पासून नेपोलियन बोनापार्ट  ( पहिला )  याच्या उदयापर्यंतचा काळ  (१७९९ )  हा सामान्यतः फ्रेंच राज्यक्रांतीचा काळ समजण्यात येतो  पण हा काळ  १७९२  पर्यंतच धरण्यात यावा व तदनंतरचा हिंसात्मक कृतींनी भरलेला अराजकाचा आणि दहशतीचा काळ हा क्रांतीपासून वेगळा समजला जावा ,  असे काही इतिहासकारांचे मत आहे .

  

 ही  राज्यक्रांती यूरोपच्या इतिहासातील किंबहु ना मानवी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घटना मानली जाते .  राजकीय सांस्कृतिक आणि वैचारीक क्षेत्रात ⇨  चौदाव्या लूई पासून  ( कार . १६४३  –  १७१५ )  फ्रान्सला यू रोपमध्ये अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले होते  म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीमुळे सर्व यू रोप प्रभावित झाला ,  यात नवल नाही .  फ्रान्समधील बूँर्बा घराण्याच्या अनियंत्रित सत्तेला क्रांतीमुळे पायबंद घातला गेला .  तेथे चालत आलेली परंपरागत सरदारवर्ग व धर्मगुरू यांची मिरा स दारी क्रांतीने संपुष्टात आणली. शहरातील नवीन उदयास येणारा जो उत्पादकवर्ग त्याच्यावरील करांचा बोजा नाहीसा झाल्याने त्याला धंद्यात व राजकारणात पुढे येण्यास वाव मिळाला . जमीन कसणारा शेतकरी क्रांति काळातील कायद्यांमुळे आपल्या शेतीचा मालक बनला .  या क्रांतीमुळे फ्रान्समध्ये लिखित संविधानाची प्रथा सुरू झाली .  धार्मिक पुरोहितशाहीविरुद्ध बुद्धिवादाची प्रतिष्ठापना क्रांति काळात झाल्यामुळे राजकारणावरील चर्चची पकड कायमची ढिली झाली .

Click link for more information


https://vishwakosh.marathi.gov.in/27815/ 

No comments:

Post a Comment