Tuesday, 27 April 2021

एल निनो

दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय पश्चिम किनार्‍यावरील महासागरी प्रदेश दर काही वर्षांनी असंगत असा उबदार राहतो. या असंगत आविष्काराला महासागरविज्ञान आणि हवामानशास्त्रात एल निनो म्हणून ओळखले जाते. पृथ्वीचे वातावरण आणि पॅसिफिक महासागराच्या उष्णकटिबंधीय भागातील पाणी यांच्यामधील आंतरक्रिया हा एक वातारणीय आविष्कार एल निनोच्या रूपाने घडत असतो. २०० उत्तर ते २०० दक्षिण या अक्षांशांदरम्यान घडणारा हा आविष्कार दर सु. २ ते ७ वर्षांनी घडतो. सर्वसाधारणपणे याची सुरुवात एका वर्षाच्या उन्हाळ्याच्या प्रारंभी होते व पुढील वर्षातील वसंत ऋतूपर्यंत तो असतो. एल निनोचा परिणाम जगभरातील जलवायुमानावर (हवामानावर) होतो. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दक्षिण भागातील जलवायुमान नेहमीपेक्षा अधिक आर्द्र (दमट) होते, तर वायव्य पॅसिफिक महासागरात ते नेहमीपेक्षा अधिक कोरडे (शुष्क) होते. सु. १९८२-८३ पासून हा आविष्कार अधिक वेळा व अधिक प्रखर होत गेलेला आहे. एल निनोचा हा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार सु. १८ महिने राहतो आणि पुष्कळदा त्याच्यानंतर विरुद्ध प्रकारचा ‘ला निना’ (La Nina) हा आविष्कार घडतो. ला निनाचा प्रभाव सामान्यपणे डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. विसाव्या शतकात एल निनो २३ वेळा व ला निनो १५ वेळा घडल्याचे मानतात.

https://marathivishwakosh.org/25709/ 

No comments:

Post a Comment