Thursday, 17 December 2020

कर्करोग


कर्करोग म्हणजे काय?

कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्यांचेच नाव कर्करोगाला दिले जाते – उदा. आतड्यांमध्ये सुरू होणार्‍या कर्करोगास आतड्याचा कर्करोग किंवा त्वचेखालील बेसल पेशींमध्ये उगमस्थान असलेल्या कर्करोगास बेसल सेल कार्सिनोमा म्हणतात इ.

ज्या आजारांमध्ये असामान्य पेशींचे अनियंत्रित विभाजन होऊन त्या इतर ऊतींवर हल्ला करु शकतात अशा सर्व आजारांसाठी कर्करोग हा शब्द वापरला जातो. कर्करोगाच्या पेशी रक्त तसेच लसिका प्रणालींमार्फत शरीराच्या इतर भागांमध्ये पसरु शकतात.

कर्करोगाचे मुख्य प्रकार

  • कार्सिनोमात्वचेमधून किंवा इतर अंतर्गत अवयवांच्या आवरणातील ऊतींमधून उगम पावणार्‍या कर्करोगाचे नाव.
  • सार्कोमाहाडे, कूर्चा, चरबी, स्नायू, रक्तवाहिन्या अथवा इतर आधारिक ऊतींमध्ये सुरू होणारा कर्करोग.
  • ल्यूकेमियारक्त तयार करणार्‍या ऊतींमध्ये (उदा. अस्थिमज्जा) उगम पावणारा कर्करोग. ह्यामुळे फार मोठ्या संख्येने असामान्य रक्तपेशी तयार होऊन त्या रक्तप्रवाहात मिसळतात.
  • लिंफोमा आणि मायलोमाशरीराच्या प्रतिकारयंत्रणेमध्ये उगम पावणारा कर्करोग.
  • सेंट्रल नर्वस सिस्टिम कॅन्सरमेंदू आणि पाठीच्या कण्यातील ऊतींना होणारा कर्करोग.

कर्करोगाचे मूळ

आपल्या शरीराचे मूलस्थान असलेल्या जीवनदायी पेशींमध्ये (सेल्स) सर्व प्रकारचे कर्करोग जन्म घेतात. कर्करोग समजून घेण्यासाठी आधी आपण सर्वसामान्य पेशी कर्करोगग्रस्त कशी होते ते पाहू.

आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या पेशी असतात. ह्या पेशी वाढून त्यांचे – नियंत्रित पद्धतीने - विभाजन होते आणि त्यामधून नवीन पेशी तयार होतात. आरोग्य टिकवण्यासाठी ही क्रिया होणे गरजेचे असते. पेशी म्हातार्‍या होतात किंवा खराब होतात तेव्हा त्या मरतात आणि त्यांची जागा नवीन पेशी घेतात.


Click here more information

https://mr.vikaspedia.in/health/93094b917-935-90691c93e930/91593094d91593094b917/91593094d91593094b917 

No comments:

Post a Comment