सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार करताना मूल्ये व नितीतत्त्वे जोपासण्यामध्ये शिक्षणाची महत्त्वाची भूमिका असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ मनुष्यबळ विकासच नव्हे तर मानवी हक्कांची अंमलबजावणी ही शिक्षणाच्या माध्यमातून होते. या बाबत चिंतन व विश्लेषणात्मक अभ्यास आवश्यक आहे.
शाहू, छत्रपती (कोल्हापूर) : (२६ जून १८७४– ६ मे १९२२). महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर
संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या.
त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.
कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.
वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल’ ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्गुरू’ पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.
शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी’ म्हणून घोषित केले तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.
योग चिकित्सा : ज्या रोग चिकित्सेमध्ये योगोपचार वापरले जातात तिला ‘योगचिकित्सा’ म्हणतात. आयुर्वेद , होमिओपॅथी किंवा ॲलोपॅथी ही जशी वैद्यकीय शास्त्रे असून , रोगोपचार हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे , तसा योगशास्त्राचा चिकित्सा हा प्रमुख हेतू नाही , हे निर्विवाद आहे परंतु शतकानुशतके योगाचा चिकित्सेकरिता उपयोग करण्यात आलेला आहे.
मूळ संस्कृत शब्द ‘युज्’ या जुळणे अथवा जोडणे या अर्थाच्या शब्दावरून ‘योग’ हा शब्द बनला असून , जीवात्मा व परमात्मा यांना जोडणे किंवा एकत्र आणणे अशा अर्थी तो योगशास्त्रात वापरला जातो. योगाचा हा हेतू व तो साधण्याचे सिद्धांत अतिप्राचीन आहेत. महर्षी पतंजलींनी इ. स. पू. सु. दुस ऱ्या शतकात या शास्त्राची मांडणी केली. त्यांनी योगसूत्र या आपल्या ग्रंथात योगाचे शास्त्र अत्यंत मोजक्या शब्दांत संपूर्ण व मुद्देसूद मांडले आहे.
पातंजल योगसूत्रा त ‘यमनियमासन-प्राणायाम-प्रत्यहारधारणाध्यान समाधयोऽष्टांगानि ’ असा उल्लेख आहेत. त्यापैकी यम , नियम , आसन आणि प्राणायाम ही पहिली चार अंगे शरीरासंबंधी असल्यामुळे त्यांचा शरीरस्वास्थ्याशी , तर उरलेल्यांचा मनःस्वास्थ्याशी संबंध येतो. पहिल्या चार अंगांच्या अभ्यासाने शरीराची विशिष्ट तयारी करण्यात येऊन मनाची व चित्शक्तीची ताकद वाढ व ण्यास मदत होते.’ ‘सुदृढ शरीर तरच सुदृढ मन ’ अशी योगाची धारणा आहे. योगशास्त्रात किंबहुना भारतीय तत्त्वज्ञानात मन व शरीर एकाच संयुगाचे घटक मानले जातात. प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र ⇨ आयुर्वेदातही हीच संकल्पना रूढ आहे.
योगशास्त्र मू ळात वैद्यकशास्त्र नाही हे प्रथम लक्षात घेऊनच त्याचा चिकित्सेकरिता उपयोग करावयास हवा. हठयोग-प्रदीपिका या ग्रंथात हुषार वैद्याने वैद्यकशास्त्रानुसार योग्य ते उपचार योजावेत आणि शिवाय योग्य ते योगोपचारही करावेत , असे सांगितले आहे [ ⟶ हठयोग ] . कोणतीही चिकित्सा परिपूर्ण नाही , किंबहुना अपूर्णता हा प्रत्येक चिकित्सेचा स्थायीभावच आहे. योगचिकित्सेतही अपघातजन्य रोग किंवा संसर्गजन्य रोग यांवर उपचार नाहीत.