रामन (रमण), सर चंद्रशेखर व्यंकट : (७ नोव्हेंबर १८८८ – २१ नोव्हेंबर १९७०). भारतीय भौतिकीविज्ञ. आधुनिक विज्ञानाचा भारतात पाया घालण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. प्रकाशाच्या प्रकीर्णनासंबंधीचे (विखुरण्यासंबंधीचे) संशोधन व त्यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या परिणामाचा [⟶ रामन परिणाम] शोध यांकरिता त्यांना १९३० सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.
B N A S C College established in the year 1990 , College library have updated 17986books and Journals collection and 781user
Saturday, 27 February 2021
Not sure how to start preparing for UPSC? Here is a head-start
A goal without proper planning remains a mere dream. This is also true in the case of civil services. The Civil Service Exam, being the toughest exam in the country, requires more than just preparation. It requires what is called ‘strategy plus preparation’. A good strategy draws a thin line of separation between aspirants and smart aspirants. The latter becomes more productive with fewer inputs, whereas the former are less productive with more inputs.
https://www.thehindu.com/education/smart-strategy/article29990745.ece
Friday, 26 February 2021
आम्ही मराठीचे शिलेदार! लोकसता
२७ तारखेला मातृभाषा दिन साजरा केला जाईल.. एखादा दिवस साजरा करणे खूप सोपं होत चालंय.. पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न करतोय
https://www.loksatta.com/viva-news/celebration-of-marathi-bhasha-din-on-27-february-and-use-of-marathi-language-66025/
Wednesday, 17 February 2021
Monday, 15 February 2021
Saturday, 13 February 2021
पुराभिलेखविद्या
पुराभिलेखविद्या : इतिहासकाली लिहिलेला मजकूर म्हणजेच पुराभिलेख. असे लेखन इतिहासकालात राजवंश, सरंजामदार, धार्मिक संस्था, व्यापारी, प्रवासी, धर्मगुरु इत्यादींनी केले असून त्यांनी व्यवहार लिहून ठेवले आणि त्याचे रक्षण केले. त्यांच्या जतनास व अभ्यासास पुराभिलेखविद्या ही संज्ञा देतात. यूरोपमधील बहुतेक देशांत अशा कागदपत्रांच्या संग्रहास रेकॉर्ड (दप्तर) आणि रेकॉर्ड ऑफिस (दप्तरखाना) ह्या संज्ञा आहेत. दप्तरखान्यास अभिलेखागार या नावानेही संबोधिले जाते. हे जुने लेख सुरक्षित ठेवण्याची पद्धती, असुरक्षित लेखांना सुरक्षित करण्याची पद्धती, सुरक्षित ठेवलेले लेख वाचून त्यांचे सारांश काढणे आणि अन्य तऱ्हेने ते लेख रोजचा कारभार किंवा इतिहासलेखन यांस कसे उपयोगी पडतील, याचा विचार करून त्याप्रमाणे व्यवस्था करणे, या अनेक गोष्टींचा पुराभिलेखविद्या या विषयात समावेश होतो. हे काम ज्या ठिकाणी चालते त्याला पुराभिलेखागार किंवा अभिलेखागार असे म्हमतात. क्वचित काही ठिकाणी यास लेखागार असेही म्हटले आहे. कोणतेही राज्य किंवा कंपनी वा संस्था अगर दक्षतापूर्वक काम करणारी एखादी व्यक्ती या सर्वांना आपले व्यवहार नीट चालावे, म्हणून आपापली अभिलेखागारे उभारावी लागतात. अशी लेखागारे आधुनिक काळात अनेक आहेत. पूर्वीही अशी लेखागारे असावी
https://vishwakosh.marathi.gov.in/21009/
Click above Link
Thursday, 11 February 2021
संग्रहालये
संग्रहालये : विविध विषयांतर्गत दुर्मिळ व नावीन्यपूर्ण वस्तू आणि सामग्री यांचे परिरक्षण, जतन, संवर्धन, प्रदर्शन व अर्थबोधन करणारी एक संस्था. संग्रहालय किंवा वस्तुसंग्रहालय हा म्यूझीयम या इंग्रजी संज्ञेसाठी ( शब्दासाठी ) वापरलेला मराठी प्रतिशब्द होय. म्यूझीयम हा शब्द मूळ माऊझयॉन (mouseion) या ग्रीक शब्दापासून बनला असून प्रथम तो लॅटिनमध्ये आला व पुढे तो इंग्रजीत म्यूझीयम म्हणून प्रविष्ट झाला. माऊझयॉन या ग्रीक शब्दाचा अर्थ म्यूझेस या कला व विज्ञानाच्या देवतेचे अधिष्ठान किंवा मंदिर असा आहे. अर्थबोधन व परिरक्षण ( संवर्धन ) या दोन निकट ( जुळ्या ) संकल्पनांची उत्पत्ती, हा संग्रहालयाचा मूलभूत स्रोत ( पाया ) असून तो मानवाची चिकित्सा व जिज्ञासू वृत्ती आणि वस्तुसंग्रह करण्याची नैसर्गिक सहज प्रवृत्ती यांतून दृग्गोचर होतो. नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारांशी संबंधित बहुविध विषय उदा., कला आणि विमानशास्त्र, धर्म आणि कीडा, जीवशास्त्र आणि संगीत- शास्त्र, नैसर्गिक विज्ञाने आणि सामाजिक शास्त्रे, असे विविध क्षेत्रांतील विषय संग्रहालयांच्या व्यवस्थापनाखाली ( अखत्यारीत ) येतात. संग्रहा- लयांचा उद्देश शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक असा दुहेरी आहे. विदयार्थी, अभ्यासक व संशोधक यांबरोबरच सामान्य प्रजाजनांना संग्रहालये सेवा देतात. यथार्थतेच्या व वास्तवतेच्या दृष्टिकोनातून त्यांचा आशय ज्ञानार्जन असला, तरी दृष्टिसुख ( दृष्टीला आव्हान देणे ) याचाही तेथे गांभीर्याने विचार केला जातो. संग्रहालयांमध्ये विचारांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य आहे, तद्वतच भावनात्मक आवाहनही ती करतात. सत्यतेचा वृत्तांत लेखक ( वाकनवीस ) म्हणून संग्रहालयांचा विचार केला जावा आणि मानवी जीवनातील सद्गुणाचा गुणधर्मांचा सदुपयोग करणारी अगेसर संस्था म्हणून त्यास स्थान द्यावे, असा विचार तत्संबंधी अलीकडे व्यक्त केला जातो कारण संग्रहालये ही सांस्कृतिक वारसाची अधिरक्षक (पालक) व अन्वेषक ( विवरणकर्ता ) आहेत. ती मानवप्राणी व नैसर्गिक इतिहास, समूह विकास, फावला वेळ किंवा मनोरंजन यांच्या सुविधांची सामाजिक साधने होत.
इतिहास : आज अभिप्रेत असलेली संग्रहालयाची विकसित संकल्पना प्राचीन काळी अस्तित्वात नसावी कारण आतापर्यंतच्या पुरा- तत्त्वीय व ऐतिहासिक पुराव्यांत तत्संबंधी कोणत्याही प्रकारचे दाखले मिळाले नाहीत तथापि काही प्राचीन संस्कृतींमधील राजांनी वस्तुसंग्रह केल्याचे पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्या संस्कृत्यांपैकी बॅबिलोनिया, चीन येथील राजे तसेच ग्रीक व रोमन संस्कृतींतील शपथ-दान म्हणून केलेल्या वस्तू मंदिरांत संग्रहित करीत असल्याचे दाखले मिळतात. एवढेच नव्हे तर त्यांच्यासाठी स्वतंत्र वास्तूही उभारीत असत. त्यांत कलात्मक वस्तूंबरोबर काही नैसर्गिक दुर्मिळ वस्तू तसेच साम्राज्याच्या इतर भागांतून आणलेल्या परदेशी नावीन्यपूर्ण वस्तू असत आणि त्या अल्पसे शुल्क देऊन सामान्य जनांनाही पाहता येत असत. ⇨चार्ल्स लेनर्ड वुली या पुरातत्त्ववेत्त्यांनी बॅबिलोनियातील ⇨अर येथे उत्खनन केले. त्यांना इ. स. पू. सहाव्या शतकातील काही अवशेष मिळाले. त्या अवशेषांवरून त्यांनी असे अनुमान काढले आहे की, तत्कालीन राजे नेबुकॅड्नेझर आणि नेबोनिडस या बॅबिलोनियन राजांना काही जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद होता. एवढेच नव्हे तर तेथील एका मंदिराजवळील दालनात विटांवर लिहिलेली यादी सापडली. वुली यांच्या मते ती संग्रहातील वस्तूंची यादी असावी. नेबोनिडसची कन्या व तत्कालीन उपाध्यायीण एन्निगल्डी-नन्ना ही येथे एक विदयालय चालवीत असावी आणि तेथे एक लहान शैक्षणिक संग्रहालय असावे. या संग्रहालयापूर्वी ग्रीसमधील अथेन्स शहरात अकॉपलिस येथे इ. स. पू. पाचव्या शतकात ‘ पिनाकोथेकी ’ या दालनात म्यूझीयम या संकल्पनेशी सादृश दर्शविणारा संग्रह केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यात देवदेवतांची चित्रे होती. मॅसिडोनियन वंशातील पहिले टॉलेमी-सोटर ( इ. स. पू. ३६४-२८४) यांनी ॲलेक्झांडि्नया ( ईजिप्त ) येथे राजधानी स्थापून तेथे एक वस्तुसंग्रहालय व गंथालय स्थापन केले. हे संग्रहालय त्यांच्या राजप्रासादाला जोडून असलेल्या वास्तूत होते. त्यात खगोल- शास्त्रीय व शस्त्रकियेची साधने, प्राण्यांचे व वनस्पतींचे दुर्मिळ नमुने, प्राण्यांची कातडी, विचारवंतांचे पुतळे, तसबिरी, चित्रे, हस्तिदंती वस्तू इत्यादींचा संग्रह केला होता. कदाचित जगातील हे पहिले आधुनिक म्यूझीयम या संकल्पनेशी मिळतेजुळते संग्रहालय म्हणता येईल. या ग्रहालयाला प्रथमच म्यूझीयम ही संज्ञा त्यावेळी देण्यात आली होती. टॉलेमी-सोटर स्वत: विव्दान होते आणि त्यांनी अलेक्झांडरच्या स्वाऱ्यांचा इतिहास लिहिला. उतारवयात त्यांनी ‘सेरापीज’ नावाचा एक धर्मपंथ सुरू केला. त्यांच्या गंथालयाचा व्यवस्थापक थोर ग्रीक व्याकरणकार झनॉडटस ( इ. स. पू. ३२५-२६०) होते. त्यांनी तेथील काव्यसंग्रहाची भाषा- शास्त्राच्या आधारे विभागणी केली होती. या गंथालयात सु. ५ लाख गंथ असावेत, अशी वदंता आहे. येथील गुंडाळीच्या रूपातील गंथांच्या प्रती तयार करून त्या इतर गंथालयांना पुरविण्याची सोय तेथे होती. ईजिप्त- मधील या इतिहासप्रसिद्ध गंथालयातील सु. ४० हजार गंथ जुलिअस सीझर यांच्या सैनिकांनी प्रथम नष्ट केले ( इ. स. ४७). पुढे रोमच्या मार्क अँटनी यांनी ईजिप्तची राणी क्लीओपात्रा हिला भेट म्हणून दिलेल्या गंथामुळे ते थोडे सावरले, पण पुन्हा नंतरच्या रोमन समाटांनी आणि उमर खलीफा यांनी ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
click here more information
https://vishwakosh.marathi.gov.in/33988/
संग्रहालये व कलावीधि
संग्रहालये व कलावीधि
चित्रशिल्पादी कला, हस्तव्यवसाय, पुरावस्तू इ. दृष्टीने भारतीय परंपरा अतिशय समृद्ध आहे. या परंपरेच्या निदर्शक अशा वस्तू व वास्तू आजही अवशेषांच्या रूपाने दिसून येतात. या कलावस्तूंचे दर्शन घडविणारे प्रमुख साधन म्हणजे वस्तुसंग्रहालये होत. भारतामध्ये अशा प्रकारच्या स्थानिक, प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर लहानमोठ्या वस्तुसंग्रहालयांची संख्या तीनशेपर्यत जाते. त्याशिवाय व्यक्तिगत स्वरूपाचे संग्रह हे वेगळेच. ही संग्रहालये देशात सर्वत्र विखुरलेली आढळतात.
संग्रहालये : भारतामध्ये पुरातन काळापासून अशी संग्रहालये अथवा चित्रशाळा अस्तित्वात असल्याची साक्ष गावोगावची देवालये आजही देतात. तत्कालीन कलाकसुरीचे, शिल्पाकृतींचे, वस्त्रकलेचे, रंगचित्रांचे अथवा हस्तलिखित पोथ्यांचे दर्शन याच पुरातन देवालयांतून घडू शकते. मंदिर हे धार्मिकतेबरोबरच सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक केंद्र म्हणूनच समजण्याची पूर्वापार प्रथा आहे. त्यादृष्टीने तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरातील राजराजा संग्रहालय, सरस्वतीमहाल राजवाड्यातील कलाप्रदर्शन, श्रीरंगम् मंदिरातील संग्रहालय, मदुराईच्या मीनाक्षीसुंदरेच्या मंदिरातील संग्रहालय आणि तिरुपतीचे व्यंकटेश्वर संग्रहालय ही सर्व उल्लेखनीय आहेत. यांतील काहींत मूर्ती, धातुशिल्पे, हस्तिदंती शिल्पे तर काहींत जुन्या कागदपत्रांचा मोठा संग्रह आढळतो.
मध्ययुगीन काळात विजयी राजे जितांकडून मिळविलेली विजयचिन्हे किंवा हिरेमाणकांची तसेच इतर कलावस्तूंची लूट इत्यादींचे संग्रह-प्रदर्शन करीत तर शौकीन सरदार, रसिक श्रीमंत किंवा व्यासंगी विद्वान लोकही जडजवाहीर व मूल्यवान रत्ने, कलात्मक वस्तू वा दुर्मिळ चिजा यांचा संग्रह करून ठेवीत. दुर्मिळ धार्मिक पोथ्यांच्या संग्रहाच्या दृष्टीने झांशीची पुस्तकशाला प्रसिद्ध होती.
Clic here More Information
https://vishwakosh.marathi.gov.in/40772/
Wednesday, 10 February 2021
महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती.
शिवाजी, छत्रपति : (१९ फेब्रुबारी १६३०–३ एप्रिल १६८०). महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दांपत्यापोटी ⇨शिवनेरी किल्ल्यावर (जुन्नर तालुका – पुणे जिल्हा) झाला. त्यांच्या जन्म-तिथीविषयी एकमत नाही. मराठी बखरींच्या आधारावरून त्यांचा जन्म १६२७ मध्ये झाला पण जेधे शकावली, कवींद्र परमानंद याचे शिवभारत आणि राजस्थानात उपलब्ध झालेल्या जन्मपत्रिका, या विश्वसनीय साधनांवरून फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख बहुतेक इतिहाससंशोधकांनी आणि आता महाराष्ट्र शासनानेही निश्चित केली आहे.
शिवाजी महाराजांचे पूर्वज चितोडच्या सिसोदिया घराण्यातील होते, अशी लौकिक समजूत आहे. हे घराणे दक्षिणेतील होयसळ वंशातील आहे, असेही संशोधन पुढे आले आहे. मालोजी हे या घराण्यातील पहिले कर्तबगार पुरुष. त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुलगे होते. मालोजी हे निजामशाहीतील एक कर्तबगार सरदार होते. मालोजी व त्यांचे बंधू विठोजी यांच्याकडे औरंगाबादजवळचे वेरुळ, कन्नड व देऱ्हाडी (देरडा) हे परगणे मुकासा (जहागीर) म्हणून होते. शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजी मरण पावले. त्यांच्या नावाची जहागीर शहाजींच्या नावाने राहिली. निजामशाहीच्या दरबारातील खंडागळेच्या हत्तीच्या प्रकरणावरून शहाजी व लखूजी जाधव यांच्यात वितुष्ट आले, ते पुढे कायम राहिले. शहाजींनी १६२० पासून निजामशाहीच्या बाजूने आदिलशाहीविरुध्द लढण्यास सुरुवात केली होती पण १६२४ मध्ये भातवडीच्या लढाईत पराक्रम करूनही त्यांचा सन्मान झाला नाही, म्हणून ते आदिलशाहीस मिळाले पण इब्राहिम आदिलशहाच्या मृत्युनंतर ते पुन्हा निजामशाहीत आले.